अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS- ना.धनंजय मुंडे वाढदिवस विशेष



  1.  

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत उभारण्यात आलेले भव्यदिव्य कट आऊट...........


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

35 वर्षांची सोबत... साहेब, हा वाल्मिक सदैव सोबत राहील!*
🕳️✍️वाल्मिक कराड✍️🕳️

माझे नेते धनंजय मुंडे साहेबांचे वय साधारण 12-13 वर्षे असेल तेव्हापासूनची आमची सोबत. स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा यांच्या आशीर्वादाने मी मुंडे कुटुंबातील सर्व चढ उतारांचा साक्षीदारच नव्हे तर सोबती पण आहे. अण्णा तर मला मुलगाच मानत असत, एवढा त्यांचा विश्वास माझ्यावर!

35 वर्षांच्या या काळात माझ्या साहेबांनी केलेला प्रवास प्रचंड खडतर होता. परंतु कधीही न डगमगता साहेबांनी एक एक पाऊल टाकले. अनेक आरोप झाले, अनेक संकटे आली, भरल्या ताटावरून उठवण्यात आलं परंतु तरीही आम्ही खचलो नाहीत. कधी साथ सोडली नाही कारण माझ्या मनाला माहीत होतं की साहेबांची बाजू ही सत्याची आहे! आणि ईश्वर शेवटी का असेना पण सत्याच्या बाजूने कौल देतोच हे नियतीने सिद्ध केलं. 
अगदी सुरुवातीच्या काळात गणेश मंडळाच्या माध्यमातून गणोशोत्सव साजरा करणे असो, अलीकडच्या सेवाधर्म सारखा उपक्रम असो, साहेब मोठ्या विश्वासाने माझ्यावर नियोजन करण्याची जबाबदारी सोपवतात, हे सर्वांना माहीत आहे. पण या बरोबरच इथल्या लोकांसाठी साहेबांच्या डोक्यात खूप काही सुरू असतं.याचच एक उदाहरण बघा, पहिल्या लॉकडाऊन काळात काही शेतकऱ्यांना भाजीपाला विकता आला नाही, 'साहेब, आमच्या भाजीपाल्याचे काय करावे?' म्हणत ती लोकं जगमित्र कार्यालयात आली, साहेब म्हणाले, 'वाल्मिक, हा सगळा भाजीपाला बाजारभावाने खरेदी करा, गावात बघा आणखी कुणाचा विकायला अडचण आहे का? हा सगळा खरेदी करा आणि गरजू लोकांना वाटून टाका!''साहेब रिक्षावाले, हमाल अशा लोकांना किराणा माल नाही', साहेब म्हणाले, 'वाल्मिक मतदारसंघातील ज्या लोकांना किराणा नाही, त्यांची, गाव, वॉर्ड निहाय याद्या बनवा आणि सगळ्यांना आपल्याकडून घरपोच किराणा द्या!' आम्ही नियोजन केले आणि गेल्या वर्षी 70 हजार कुटुंबांपर्यंत पोचलोत. अशी एक ना हजारो उदाहरणे मला साहेबांच्या स्वभावातील सांगता येतील. 
अगदी अलीकडच्या काळात दुसऱ्या लाटेत जेव्हा रेमडीसीविर इंजेक्शन साठी लोकांना धावपळ करावी लागत होती, आम्हाला, साहेबांना अनेक फोन येत असत... साहेब एके दिवशी म्हणाले, 'वाल्मीक, मी इंजेक्शन उपलब्ध करून देतो, परळीत कुणालाही इंजेक्शन कमी पडू देऊ नका आणि कुणालाही विकत घेऊ देऊ नका, सगळ्यांना आपण मोफत देऊ!'

साहेबांनी अनेक प्रयत्न करून त्यांचा तो शब्द खरा केलाच...परळीवर साहेबांचे प्रचंड प्रेम, विधानसभेच्या निवडणुकीत साहेबांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत आहेत. आज एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली विकासकामे देखील लवकरच पूर्ण होतील. साहेब शहरात सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, नागरिकांना कामांचा त्रास होऊ नये यासाठी सतत आग्रही असतात. 
बऱ्याचदा आम्हाला वाटतं की साहेबांना अमुक विषय माहीत नसेल, आपण अवगत करावा, पण साहेबांना आमच्या आधी तो विषय माहीत असतो. इतक्या बारकाईने साहेबांचे परळीशी घट्ट नाते आहे. 
आज साहेबांचा जन्मदिवस आहे, साहेबांवर आजवर अनेक संकटे आली, आरोप झाले, त्यांना समाजापुढे खलनायक म्हणून प्रक्षेपित करण्यात आलं पण साहेबांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाच्या बळावर या सर्वांना मात देत सबंध राज्यात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. संकटे येतील जातील, आज राज्यात काम करण्याचे पद आहे... उद्या यापेक्षा मोठी पदे येतील, पण साहेब हा वाल्मिक तुमच्या कडे कोणतेही पद नव्हते तेव्हापासून सोबत आहे व अखेरच्या श्वासापर्यंत राहील. 
माझा श्वास आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना या जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा... 

✍️वाल्मिक आण्णा कराड (गटनेता, ✍️
नगर परिषद, परळी)


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#साहेब..................!
(ना.धनंजय मुंडे यांचे स्विय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून)

साहेब,
हे शब्द म्हणजे आमच्यासाठी तुम्हीच.
मायेची सावली म्हणजे तुम्हीच..
एक भक्कम आधार म्हणजे तुम्हीच..
तुम्हीच आमचे दैवत..
तुमच्यासाठी एक नाही तर हजारदा जीव 'कुर्बान'
देवाने मला जर एक वर दिला तर मी हेच मागेल की पुढच्या सर्व जन्मात मला तुमचा 'हनुमान' व्हायची संधी दे..!!
कधी कधी शब्दही तोकडे पडतात आपल्या भावना मांडण्यासाठी..कारण हृदयाचे स्पंदने कागदावर उमटविता येत नाही.... 


गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसोबत सावली प्रमाणे सोबत आहे. साहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतार, त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष, यशापयश या सर्वांचा मी साक्षीदार आहे. आज साहेब राज्याचे मंत्री महोदय म्हणून काम करत असताना देखील मी पूर्णवेळ सोबत आहे. पण आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज मला त्यांच्यातील मायाळू व्यक्तित्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकावयचा आहे. 


जून 2020 मध्ये साहेबांना पहिल्यांदा कोविडची बाधा झाली. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक साहेबांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण साहेब आम्हाला 'माझ्या सोबत किंवा जवळ येऊ नका' म्हणून आग्रह करत! काहीच वेळात मी व आमचे आणखी काही सहकारी देखील पॉझिटिव्ह आलो आणि साहेबांची चिंता वाढली. 

साहेब स्वतःवर उपचार घेणे एकीकडे पण आमची मात्र सतत चौकशी करत, आम्ही वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल होतो, त्यामुळे तेथील डॉक्टरांना साहेब सतत फोन करून आमची काळजी घेण्यासाठी आग्रह करत. त्याच काळात काही दिवसांपूर्वी माझी आई गेली होती, पण साहेबांनी मला आधार दिला. 


पुन्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेत आम्ही दोघे सोबतच पॉझिटिव्ह आलो, पण यावेळी माझी चिंता वाढली कारण माझे बाबा पण पॉझिटिव्ह आले होते. त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना औरंगाबाद ला हलवले. मी पूर्ण बरा नसताना देखील रुग्णालयातून सुटी घेतली आणि औरंगाबाद ला पोचलो. बाबांवर उपचार सुरू होते. बाबांनी तब्बल 28 दिवस शरीरातील विषाणूला लढा दिला. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना आमचे साहेब दिवसातून किमान दोन वेळा दररोज फोन करत, विचारपूस करत. काय उपचार सुरू आहेत, ऑक्सिजन फ्लो किती आहे, असे सर्व बारकावे मला आणि संबंधित डॉक्टरांना सुद्धा विचारत. 


आपण ज्यांची सावली बनून वावरतो, प्रत्येक सुखाच्या क्षणात सोबत असलेले एवढे मोठे नेतृत्व दुःखाच्या, संकटाच्या समयी आपली सावली बनुन आपल्याला आधार देते हे मनाला समाधान देणारी बाब मी त्या काळात अनुभवली. 

आमचे प्रयत्न निष्फळ ठरतात की काय अशी वेळ आली, डॉक्टर म्हणाले ऑक्सिजन औषधे कृत्रिम गोष्टी आता सपोर्ट करत नाहीत, आपण थांबू या का ? साहेबांना हे  कळताच साहेब त्या डॉक्टरांना रागावले, म्हणाले एवढी आधुनिक उपकरणे कशासाठी आहेत मग? 


पण शेवटी नियतीपुढे काही चालले नाही, बाबा गेले. त्या दुःखातून सावरण्यासाठी मला साहेबांनी खूप आधार दिला. 

एवढी वर्ष आम्ही सोबत घालवली आहेत, आता आमच्यात एक वेगळीच ट्युनिंग जुळलेली आहे. साहेबांची मला व माझी साहेबांना अगदी डोळ्यांची भाषा देखील कळते. साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज येतो.

सततचा प्रवास, कुठेही असलो तरी हजारो लोकांच्या भेटीगाठी, असंख्य कामे, पुढचे प्लॅनिंग यामध्ये कामाचा कंटाळा केलेला मी साहेबांना कधीही पाहिलं नाही. साहेबांच्यात नेतृत्व गुण जसे उपजत आहेत तसेच त्यांची लोकाभिमुख वृत्ती देखील उपजतच आहे. 

आमच्या परळीची एमआयडीसी असेल, ऊसतोड कामगार महामंडळाचे काम असेल, ही कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी साहेबांची धडपड आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही दररोज पाहतो. जोपर्यंत हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, हा त्यांचा मूळ स्वभावच आहे. त्यामुळे ही सगळे कामे साहेब ठराविक वेळेत पूर्ण करतील असा विश्वास नव्हे तर एक सोबती-सहकारी म्हणून ती खात्री आहे.  


मीच नव्हे तर सर्व सहकाऱ्यांशी कौटुंबिक नाते असल्याप्रमाणे वात्सल्य देणारे साहेब, कधी रागावलेच तर दुसऱ्या क्षणाला हसुन बोलणारे साहेब, लहान-मोठ्या प्रत्येक कामाला महत्व देऊन ते पूर्ण करणारे साहेब, शाश्वत विकासाचे ध्येय उराशी बाळगून त्या मार्गाने मार्गक्रमण करणारे साहेब, अशी विशेषणे द्यायला लागलो तर विशेषणे संपतील पण साहेबांचे गुण नाही! अशा आमच्या साहेबांना या जन्मदिनाच्या निमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा. 

साहेबांची वटवृक्षाप्रमाणे दाट सावली अशीच आपल्या सर्वांवर राहो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना...

                                 - प्रशांत जोशी, 
                         स्विय सहाय्यक,ना.धनंजय मुंडे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------


ना.धनंजय मुंडे:लोकसेवेचा वसा नटाने पुढे घेऊन जाणारा 'सेवाधर्मी' वारसदार 
   (लेख .........✍️ मोहन साखरे, परळी वै. )

          आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन बघितले की ना.धनंजय मुंडे म्हणजे लोकसेवेचा वसा नेटाने पुढे घेऊन जाणारा 'सेवाधर्मी' वारसदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नामदार धनंजय मुंडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!


       
 महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे ना.धनंजय मुंडे हे आहेत. ना.धनंजय मुंडे साहेबांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अनेक संकटं आली, कधी पाय रक्ताळलेले, तर कधी मनाला दु:ख आणि वेदनांचा चिखल तुडवत पुढे जावे लागले. अनेकदा विरोधकांनी धनंजय मुंडे संपल्याचा कांगावा करत आनंद ही साजरा केला, पण तो फार काळ टिकला नाही. सर्व मार्गांनी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारे केले. पण कर्तृत्वाची नीव एवढी पक्की की सगळ्या संकटांना आणि राजकीय कुरघोड्यांवर मात करून हे आमचं धिरोदात्त नेतृत्व 'जब जब भी बिखरा हुं,नयी रफ्तार से निखरा हुं' याप्रमाणे सिद्ध झाल्याचे उभ्या महाराष्ट्राला दिसुन आले आहे.आज आमचा  नेता महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. प्रत्येक सभेला लाखोंचा जन समुदाय आणि शब्दा शब्दांवर समुद्राच्या लाटाप्रमाणे उसळणारा जनसागर पाहिला की उर अभिमानाने भरून येतो. 


       राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून ना.धनंजय मुंडे यांनी धुरा हाती घेतली आणि राज्यातील वंचित - उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नतीचे रंग भरण्याचे काम त्यांनी केले आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात विकासाची खरीखुरी गंगा आणण्याचे काम ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. गोरगरीब, वंचित - उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नती व विकासाचा रंग भरण्यातच खरे सार्थक आहे हे उद्दिष्ट ठेऊन  ना. मुंडें यांनी वाटचाल केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम - हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने अशा ५००० गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप केले. गेल्या दोन वर्षांपासून अविरत सेवाकार्य सुरू ठेवले.बीड जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे असो की विविध रुग्णालयांच्या सेवासुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणे यात स्वतः लक्ष घालून जनतेच्या प्रशनात खर्याखुर्या पालकाची जबाबदारी पार पाडली आहे.


       राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून गोरगरीब, वंचित, उपेक्षित,दिव्यांग, विविध सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा मंत्री एकमेवाद्वितीयच आहे.सामाजिक कल्याणकारी धोरणं आखली व जनकल्याणाचे निर्णय घेत बार्टी, विविध अर्थिक महामंडळांना नवसंजीवनी देणं असो यामध्ये कुठेच ना.मुंडे यांनी कमतरता ठेवलेली नाही.सामाजिक न्याय विभागासारख्या लोकाभिमुख खात्याला खरोखर न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. परळी मतदारसंघात विकासाची गंगा प्रवाहित करुन चौफेर व सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे.परळी मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

           नामदार धनंजय मुंडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!  लाडक्या नेत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या हातुन सेवा घडो हीच प्रभु वैद्यनाथ व  चरणी विनम्र प्रार्थना...!
         

 
✍️✍️✍️✍️
- मोहन साखरे
 परळी वैजनाथ.
✍️✍️✍️✍️✍️



-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अभिष्टचिंतन केले.


वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ना.धनंजय मुंडे यांचे खा.सुप्रियाताई सुळे यांनी अभिष्टचिंतन केले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख क्रमांक २....✍️ प्रा.शामसुंदर दासूद 

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

ना.धनंजय मुंडे यांचा लोकहितकारी "सेवाधर्म"...!🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदतीची खरी गरज असते. परंतु संपूर्ण समाज जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाच्या मदतीसाठी पुढे येणारी माणसं ही खऱ्या अर्थाने "हिरो"असतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भीषण स्वरूप आपण सर्वांनी अनुभवले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राबरोबरच बीड जिल्हाही होरपळून निघाला होता. बीड जिल्ह्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या संकटावर मात करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करत असतांनाच आपल्या कर्मभूमी आणि मातृभूमीतील लोकांना धीर देण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी परळीचे भूमिपुत्र आणि आपले सर्वांचे कर्तृत्ववान नेतृत्व, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांनी "सेवाधर्म" सारे काही समष्टीसाठी या संकल्पनेतून परळी शहर आणि तालुक्यातील आपल्या लोकांसाठी हा यज्ञ उभा केला. या सेवा यज्ञात आदरणीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी आणि शहर सचिव तथा नाथ प्रतिष्ठानचे सचिव अनंत इंगळे यांच्या टीमने अतिशय उत्तमरित्या काम करत सामूहिकरीत्या मदत करण्याचा एक नवीन आदर्श परळी तालुक्यात समोर ठेवला आहे. ना. मुंडे साहेबांच्या संकल्पनेतील या सेवा यज्ञात एक साथ तीन ते चार आघाड्यांवर मदतीचे कार्य हाती घेण्यात आले होते.

 


1) कोरोना योद्ध्यांची मदत करणे आणि त्यांचे प्रोत्साहन वाढविणे----

   कोरोना काळातील अतिशय भीतीच्या वातावरणात प्रत्यक्ष फिल्डवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सेवा धर्माच्या टीमने फिल्डवर काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना 1500 सुरक्षा किट वितरित करण्यात आल्या. या किटमध्ये ऑक्सीमिटर, जलनेती पात्र, सॅनिटायझर इत्यादी सुरक्षाविषयक वस्तूंचा समावेश आहे. याबरोबरच शहरातील विविध दवाखान्या मध्ये काम करणाऱ्या'क' आणि 'ड'दर्जाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना टिफिन बॉक्स चे वितरण करण्यात आले आहे.कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची विमा पॉलिसी उतरविण्याचे काम हे सेवा धर्माकडून करण्यात आले आहे

2) कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची आणि मोफत उपचाराची व्यवस्था--परळी शहरात बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला विलगीकरण केंद्राची निर्मिती सेवा धर्माच्या टीमकडून करण्यात आली होती. यामध्ये महिला आणि लहान मुलांसाठी 100 खाटांचे सुसज्य विलगीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या विलगीकरण केंद्रात शहर आणि तालुक्यातील महिला रुग्णांसाठी मोफत उपचार याबरोबरच राहण्या-खाण्याचीही मोफत व्यवस्था करण्यात आलेली होती. एवढेच नाही तर मनोरंजनासाठी टीव्ही आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही उभी करण्यात आली होती. या केंद्रात डॉ. देशपांडे आणि डॉ. टिंबे या तज्ञ डॉक्टरां बरोबरच कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा बहाल करण्यात आली होती.'टेलीमेडिसिन सेवा' या योजनेअंतर्गत कोरनाविषयी काही शंका असल्यास किंवा उपचार विषयक काही माहिती हवी असल्यास फोनद्वारे कोरैना विषयी औषधांची आणि घ्यावयाच्या काळजीची माहिती तज्ञ डॉक्टरांकडून दिली जात होती. 

3) गरीब कुटुंबांना विवाह निधी--नाथ प्रतिष्ठान आणि सेवाधर्म यांच्या टीमने सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचे अभिमानास्पद मदत कार्य केले आहे. तालुक्यातील 150 गरीब कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये मुलीच्या विवाहासाठी मदत म्हणून वितरीत करण्यात आले आहे. ज्या गरीब कुटुंबातील मुलीचा विवाह या कोरोना काळात करण्यात आला त्यांना मदत म्हणून साहेबांच्या वतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.एवढेच नाही तर म्यूक्रोमायक्रो- सिस या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना ही आदरणीय वाल्मीक आण्णांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी रोख मदत करण्यात आली

 4) कोरोना विषयी जागरूकता निर्माण करत विविध प्रकारचे मदत कार्य-- सेवा धर्माच्या टीमकडून कोरोना काळात अनेक प्रकारची मदत कार्य हाती घेण्यात आली होती. स्व. पंडित अण्णा भोजन ग्रह आणि सेवाधर्म यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून जागृती मोहीम राबविण्यात आली. यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लसीकरण नोंदणी कक्षाची स्थापना करून नागरिकांची मदत करत होते. याबरोबरच लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना सेवा धर्माच्या टीमकडून मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील जे लोक कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत अशा लोकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून सेवा धर्मातील टीमच्या कार्यकर्त्यांनी प्रोटीन बँक या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना मोफत अंडी व मटकीचे वितरण केले आहे. साहेबांच्या संकल्पनेतील सेवा धर्माची जबाबदारी स्वीकारून कोरोना काळात समाजाची सेवा केलेल्या सेवा धर्म टीमचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु मंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी असताना, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्याची जबाबदारी असताना आपल्या कर्मभूमिची विशेष काळजी असणारे आणि एवढ्या सगळ्या कामाच्या ताणातूनही आपल्या लोकांसाठी सेवा धर्माच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करणारे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व ना. धनंजय मुंडे साहेब हे विशेष कौतुकास पात्र आहेत. साहेबांनी उभा केलेल्या या सेवा कार्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन  

                           -✍️लेखक✍️

                 प्रा.शामसुंदर दासुद,परळी वैजनाथ.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महारक्तदान शिबीर नोंदणीचा अजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ 
 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित "आरोग्य सेवा सप्ताह" या लोकोपयोगी आरोग्यदायी उपक्रमात सोमवार दिनांक 19 जुलै रोजी "महारक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
आज शिबिराच्या फॉर्म नोंदणीचा शुभारंभ जि.प.गटनेते अजय मुंडे,यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवक शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई,ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, राष्ट्रवादी सेवादलचे अध्यक् लालाभाई पठाण,माजी नगरसेवक अझीझ कच्छी,रवी मुळे,स्वप्नील वेरुळे,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवटे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

*पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य सेवा सप्ताहाचा शुभारंभ व अभिष्टचिंतन*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य आरोग्य सेवा सप्ताहाचा शुभारंभ व ना.धनंजय मुंडे अभिष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे.
   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी ११ वा. ना.धनंजय मुंडे "अभिष्टचिंतन सोहळा", संजय गांधी निराधार योजनेच्या 1500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीच्या शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आरोग्य सेवासप्ताह मधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*नावाच्या शेवटी जरी 'जय' असला तरी तो दैदिप्यमान कर्तृत्वातून मिळालेला आहे...*

            ✍️सुधीर सांगळे (बीड)✍️

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान ना. जयंत पाटील साहेब यांच्यासोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. धनंजय मुंडे साहेब जयंत पाटलांच्या नावात सुरुवातीलाच 'जय' आहे आणि माझ्यात नावात तो शेवटी आहे त्यामुळे कदाचित मला 'जय' मिळवण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला असे म्हणाले. हल्ली काही जण स्वतःचा वारसा हक्क सांगत स्वकीयांशी जय मिळवण्यासाठी धर्मयुद्ध करताना दिसत आहेत. पण राजकारणात जय मिळवण्यासाठी केवळ वारसा हक्क नाहीतर त्याला दैदिप्यमान कर्तृत्वाची जोड लागते. धनंजय मुंडे साहेबांच्या गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यांचा उशिरा झालेला जय हा त्यांच्या कर्तृत्व सिद्धतेचा परिपाक आहे हे वेगळं सांगायची गरज भासत नाही.

कर्तृत्व त्याच्याच हातून घडत असतं जे ते पार पाडायची इच्छाशक्ती ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण रस्त्यावर चालायचं धाडस करतात! थोडक्यात काय तर राजकीय जीवनात मोठं व्हायचं असेल तर थेट लोकांशी घट्ट नाळ जोडावी लागते. धनंजय मुंडे यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट नाळ जोडून कसे उभे आहे याचे एक जिवंत उदाहरण सांगतो, धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या वाटचालीत सुमारे 11 वेळा सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून जवळपास 1200 भगिनींचे कन्यादान केले. कोरोना काळात सामुदायिक विवाह सोहळाच काय, कुठलाच कार्यक्रम घेणे शक्य नव्हते; मग दीड वर्षात आपत्तीने त्रासलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील लग्नासाठी दिलासा देण्याचा विचार करत सामुदायिक विवाह सोहळ्याचे उत्तरदायित्व धनुभाऊंनी वेगळ्या पद्धतीने पार पाडले. कोविड बाधित होऊन गेलेल्या 175 गरीब व गरजू कुटुंबातील लग्नांना धनुभाऊंनी थेट आर्थिक मदत केली.कोरोनामुळे मरतो की वाचतो अशी आमची परिस्थिती होती, त्यात घरात मुलीचे लग्न अशावेळी न मागता धनुभाऊंनी आमच्या लेकीच्या लग्नाला पैसे दिले, ही मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे' असे म्हणत एका माउलीने डोळ्यात पाणी आणून व्हीडिओ कॉल करून भाऊंना आशीर्वाद दिले. ही नाळ लोकांशी जोडणे 'हर किसिके बस की बात नही!'राजकारणात टीका होतात, पदे येतात आणि जातात, परंतु लोकाभिमुख काम करणाऱ्या नेतृत्वाला संघर्ष व संकट अटळ असते. पण संघर्षाच्या वाटेवर चालून आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे कौशल्य ज्याला असते तोच लोकमान्य नेता ठरत असतो.'बंजर धरती मे बहार न खिलाई तो धनंजय मुंडे नाम बदल कर रख दूँगा।' असे पक्षश्रेष्ठीना ठणकावून सांगणारे धनंजय मुंडे हे प्रभावी वक्ते, उत्तम संघटक म्हणून राज्यभर लोकप्रिय आहेत. अलीकडच्या कोविडच्या काळात आलेल्या संकटाला संधी मानत त्यांनी प्रशासकाची जी भूमिका बजावली त्यातून ते एक कुशल प्रशासक व पालक सिद्ध होत आहेत.कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या दोन्ही लाटेत बीड जिल्ह्याने नेटाने संघर्ष केला. पण देशाबाहेर जागतिक स्तरावर कौतुक झाले ते बीड जिल्ह्यात अगदी सुरुवातीला अंमलबजावणी केलेल्या कडक लॉकडाऊनचे! मार्च मध्ये राज्यात आलेला कोरोना बीड जिल्ह्याने जून पर्यंत वेशीबाहेर ठेवला होता. त्याचे कारण होते त्व धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन. तो काळ आठवला की विरोधकांनी लॉकडाऊन काळात केलेलं राजकारण आणि टीका आठवल्याशिवाय राहत नाही. पण जिल्ह्याच्या बैठकीत, 'प्रशासकीय अधिकारी चांगले काम करत असतील तर लोकप्रतिनिधींनी त्यांना जाहीर सहकार्य करावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि चुका होत असतील तर त्या खाजगीत सांगाव्यात, सूचना कराव्यात' असा सल्ला मुंडेंनी बहाद्दर विरोधकांना दिला. ते सुधारले नाहीत हा भाग वेगळा!पण आजही लॉकडाऊनचे नियोजन आणि दीड लाख ऊसतोड कामगारांचे केलेले यशस्वी स्थलांतर याची चर्चा अंतरराष्ट्रीय स्तरावर होताना दिसते आहे. त्यातून विरोधकांना उपरती आली तर देव पावला!

लोकांशी नाळ घट्ट कशी ठेवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण धनुभाऊंनी कोविड काळात दाखवुन दिले. दुसऱ्या लाटेत जेव्हा रेमडीसीविर आणि ऑक्सिजनसाठी मारामारी व्हायची वेळ आली होती त्याकाळात आमचे धनुभाऊ लोकांना फुकट इंजेक्शन वाटत होते! जिथून उपलब्ध होईल, जितक्या किमतीत होईल तितक्या किमतीत परळीतील रुग्णांना धनुभाऊंनी मोफत रेमडीसीविर पोहोच केले. परळीतच काय जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज धनुभाऊंवर टीका करणाऱ्या विरोधकांनीही खाजगीत पाय धरून इंजेक्शन नेले. कोणतीही अट न घालता, कोणताही आकस न बाळगता विरोधकांनाही जीवन संजीवनी मोफत देणारा नेता बीड जिल्ह्यात तरी दुसरा कोणी नाही!
काही ठिकाणी रुग्णालयात नागेवाईकांची होणारी गर्दी व त्यामुळे संसर्गाचा वाढता धोका पाहुन भाऊंनी सेवाधर्म सुरू केला. या सेवधर्माची चर्चा राज्यात झाली. प्रत्येक रुग्णालयात भाऊंनी आपले कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून नेमले. त्यांची सर्व काळजी घेत त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी कामे करण्याची जबाबदारी दिली. रुग्णांना नाष्टा/जेवण देखील भाऊंकडून मिळू लागले. लस घ्यायला यायला जायला गाडी पण भाऊंचीच! जागोजागी मदत केंद्र उभारले, आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवण आणण्यासाठी टिफीन बॉक्स पासून ते विमा पॉलिसी पर्यंत भाऊंनी सोय करून दिली! परळीत ज्या कुटुंबांनी कोविडचा सामना केला ते उपचार केलेले डॉक्टर व धनु भाऊ ही दोन नावे कधीच विसरणार नाहीत.
सतत लोकांत राहून दोनवेळा कोविडची लागण..*
या काळात धनुभाऊ एकही दिवस घरी बसले नाहीत, दर आठवड्याला शेकडो किलोमीटरचा प्रवास, हजारो लोकांच्या भेटी, हजारो प्रश्नांची सोडवणूक या सर्व बाबी करत असताना त्यांना एक नाही तर दोन वेळा कोविडची लागण झाली. उपचारातून ते बरे झाले खरे परंतु त्यांना आजही शारीरिक त्रास होतो. पण ज्या माणसाने सबंध जिल्ह्याला आपला परिवार मानून त्यांना आपले जीवन समर्पित केले आहे, त्यांना कोणताही शारीरिक त्रास, इजा, आजार लोकांपासून दूर ठरू शकत नाही! मुळात लोकांत जाऊन कामात मग्न राहिल्याशिवाय त्यांनाच करमत नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.दोन्ही वेळा हजारो लाखो लोकांनी भाऊसाठी प्रार्थना केल्या, दोन्ही वेळ त्यांनी कोविडवर मात करत पुन्हा लोकसेवेला सुरुवात केली.
*ऊसतोड कामगारांचा वाली आणि वाणी...*
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने समाजातील विविध स्तरातील अनेकांचे नुकसान झाले. पण सर्वात मोठे नुकसान झाले ते राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचे! स्व. साहेब त्यांचे वाली होती, त्यांच्या पिचलेल्या आवाजाला सरकार दरबारी बुलंद करणारी वाणी होते. त्यांच्या अकाली निधनानंतर लाखोंच्या संख्येतील भोळा भाबडा ऊसतोड कामगार म्हणजे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एक मोठी संख्या आहे असे म्हणून अनेकांनी त्यांच्या नेतृत्व बनण्याच्या नावाने आपली दुकाने थाटली. पण आपली शक्ती दाखवण्यासाठी संख्या म्हणून वापर करण्याखेरीज कुणालाही काही ठोस करता आलं नाही. मागील भाजप सरकारने ऊसतोड मजुरांसाठी एक शासन निर्णय घाईघाईत केला होता, त्यातील एक डोक्यात संताप आणणारी योजना वाचून कुणालाही राग आला असता. ती अशी होती, की ऊसतोड मजूर ऊसतोडणी करन्यासाठी स्थलांतरित असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी अर्थसहाय्य! बरं झालं ते सरकार गेलं!नवीन सरकार मध्ये मंत्री होताच धाकल्या मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांच्या नावाने असलेल्या महामंडळाचा कारभार आपल्या खात्याकडे घेतला. बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून या महामंडळास महाराष्ट्रात साखर उद्योग अस्तित्वात असेपर्यन्त निधी कमी पडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या संत भगवानबाबांच्या नावाने धनुभाऊंनी शासकीय वसतिगृह योजना सुरू केली. या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 12 वसतिगृह त्यांनी मंजूर केले. आजवर पहिल्यांदाच या महामंडळाला भागभांडवली खर्चासाठी निधीची तरतूद सुद्धा झाली! ऊसतोड कामगारांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे, त्यांचे व कुटुंबाचे आरोग्य इथपासून ते त्यांची मुलं शिकून मोठी व्हावीत, उसतोड्याची आर्थिक उन्नती होऊन हातातला कोयता कायमचा सुटावा इथपर्यंत स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकणारे धनंजय मुंडे आता या ऊसतोड मजुरांचे वाली आणि वाणी सिद्ध होत आहेत, आजमितीला ही बाब कोणीच नाकारू शकत नाही!
*एमआयडीसी येणार आणि जिल्ह्याची स्थिती बदलणार...*
परळी तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जागेत पंचतारांकित एमआयडीसी उभारावी हे तीन दशकांपासूनचे सर्वांचेच स्वप्न; आज ते पूर्ण करण्याचा विडा उचलून भाऊंनी प्रक्रिया सुरू केली. मंजुरी मिळून नोटिफिकेशन निघाले. पहिल्या टप्प्यात 35 हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित झाली.इथे उद्योगांना व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी धनंजय मुंडे आता प्रयत्नात आहेत. भविष्यात या एमआयडीसीचे स्वरूप पंचतारांकित असणार आहे. यातून परळीच नव्हे तर सबंध बीड जिल्ह्यातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
*दूरदृष्टी असलेलं नेतृत्व...*
एकीकडे कोविड सोबत आणखी लढा सुरूच आहे, त्यात तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोट्यावधी रुपये खर्चून जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा उपक्रम धनंजय मुंडे साहेबांनी सुरू केला आहे. 
थर्मलमध्ये गरम पाण्याला थंड करणे व त्यात शेवाळ किंवा घाण साठू नये यासाठी ऑक्सिजन प्लांट असतो, तो ऑक्सिजन प्लांट इमर्जन्सी आहे म्हणून रुग्णालयात बसवला जाऊ शकतो का, असा विचार करून तो सत्यात उतरवला आणि परळीच्या थर्मल मधील ऑक्सिजन प्लांट अंबाजोगाईच्या एसआरटी वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करून केवळ 12 दिवसात उभा राहिला. तेव्हा ऊर्जा विभागाच्या व प्रशासनाच्या देखील हे लक्षात आलं त्यांनी हा प्रयोग पायलट प्रोजेक्ट मानत इतरत्रही सुरू केला. मा. उर्जामंत्री व मा. ऊर्जा राज्यमंत्री यांनी देखील ना. धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. 
        जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना एका शासकीय बैठकीत प्रशासनातील काही कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरताना साहेब म्हणाले, 'हे बघा, प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे, तो वाचविणे तुमची आणि माझी देखील जबाबदारी आहे. हा प्रसंग सगळ्यांसाठी त्यांच्यातील कौशल्याची परीक्षा घेणारा आहे. तेव्हा आपल्यातील कौशल्य पणाला लावून तुम्ही तुमचे काम करा, मी माझे करतो' त्यानंतर जिल्ह्यात एकही दिवस ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही!
या काळात आमच्याकडे घरात बसून, उंटावरून सरकारला सल्ले देणारे, टीका करणारे अनेक नेते होते व आजही आहेत. पण धनंजय मुंडे साहेबांनी मात्र सबंध जिल्हा आपले कुटुंब म्हणत अत्यंत संवेदनशील निर्णय घेतले. शेवटी कासय ना, उंटावर बसून शेळ्या राखणे हा वेगळा भाग परंतु ज्या माणसाची नाळ जनतेशी घट्ट जोडलेली आहे, तो माणूस आपल्या लोकांना संकटात वाऱ्यावर सोडून याच्या-त्याच्या वर टीका करत बसूच शकत नाही. तो माणूस, 'आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हीही शक्य असेल ती मदत करा' असे आवाहन विरोधकांनाही करतो! आणि विरोधक एकेरीवर टीका करण्यात व्यस्त राहतात. शेवटी जनतेचे प्रेम आणि नेत्याचे कर्तृत्व स्वयंसिद्ध होते आणि विरोधक मात्र चर्चा आणि ठिकाणचे गुऱ्हाळ चालवत बसतात. गीतेतील 'न मे कर्म फल स्पृह:' या ओळीप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जो केवळ कार्य-कर्तृत्वाच्या जीवावर मार्गक्रमण करत असतो, यश त्याच्या पदरी आपोआप येतच असते! म्हणूनच वर म्हटलं की नावात 'जय' शेवटी असला तरी विधानसभेतील विजय असेल किंवा अन्य उपलब्धी, त्या कर्तृत्व सिद्ध करून मिळालेल्या आहेत.अशा स्वयंसिद्ध, यशस्वी, कर्तृत्ववान नेतृत्वाला जन्मदिनानिमित्त माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! साहेब, आपले नाव घेण्यापूर्वी विशेषणे कमी पडावीत, आपणास, यश, कीर्ती व उत्तम आरोग्य लाभो हीच ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या चरणी प्रार्थना...
 *© - सुधीर सांगळे*
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या आठवणीतील धनंजय.........
'खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछें बता तेरी रजा क्या है..

आजही आपल्या सभोवती उत्तुंग व सर्वोच्च ध्येय ठेऊन जगावेगळ जीवन जगणारी माणसं आहेत, याची त्यांना स्वतःलाही जाणीव नसते. अशा जगावेगळ्या व्यक्तीपैकी क्रांतीकारी विचाराचे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे मा.ना.श्री. धनंजयजी मुंडे साहेब.प्रत्येकाला असे वाटते की राजकारणात पदावर असलेल्या व्यक्तिला त्या पदामुळेच महत्त्व प्राप्त होते, पण धनंजय ला पाहिल्यास असे लक्षात येते की त्याच्या धुरंधर व प्रभावशाली कामगीरी मुळेच त्या पदाला महत्त्व प्राप्त होते, आणी ते  प्राप्त झालेय, महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वतः आलेख, कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे व स्वतःची वेगळी ओळख स्वतः च्या कार्य व कर्तृत्वातून निर्माण करणारे धनंजय मुंडे म्हणजे खरोखर एक तेजस्वी अन्
 वादळी व्यक्तिमत्व आहे.

ना. धनंजय मुंडे हे एक उत्तम नेते, उत्तम राजकारणी आणी उत्तम विकासपुरुष म्हणून आज सर्वानांच परिचीत आहेत. परंतु शाळकरी धनंजय च्या स्मृती आजही माझ्या मन:पटलावर कायम आहेत.
1988 ते 1990 या तीन वर्षाच्या कालखंडात वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंग स्वामी मंदिरात (बेलवाडी) 'न्यू इंग्लीश स्कूल' नावाची, इंग्रजी माध्यमाची शाळा भरत असे. त्या काळी परळी शहरातील उच्च दर्जाच्या नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेपैकी ती एक शाळा होती. धनंजय माझा त्या काळातील इयत्ता 8 वी ते 10 वी चा विद्यार्थी. त्या शाळेत मी 8वी ते 10 वी च्या वर्गाला विज्ञान हा विषय शिकवत असे. तेंव्हाचे काही प्रसंग मला आजही आठवतात. मी वर्गात विज्ञानाशी संबंधित कांही प्रश्न, कोडी, कुटपश्न वर्गातील विद्यार्थ्यांना विचारत असे. खरं तर लगेच व ताबडतोब मुलांकडून उत्तरं यावीत अशी अपेक्षा मला नसायचीच... पण धनंजयची जागृत जिज्ञासा, विद्यार्थी सुलभ वृत्ती त्याला शांत बसु दयायची नाही. सर्वांच्या आधी धाई गडबड करून उत्तर देण्याची त्याची घाई त्यावेळी मला फार आवडायची. विद्यार्थी दशेत असतानाही माझ्या अवघड व किचकट प्रश्नांचे अव्हान ही तो लिलया पेलायचा.


शाळेत असताना त्याच्यातील नेतृत्व युग नजरेत भरण्या सारखे होते. मग ती शाळेतील गॅदरींग असो, स्कूल डे असो किंवा प्रभातफेरी अथवा रॅली असो. त्या काळी आमच्या शाळेसमोरच दर सोमवारी आठवडी बाजार, जनावरांचा बाजार भरत असे, त्या काळी धनंजय ने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून' बाजारच्या दिवशी शाळेत अध्ययन प्रक्रियेत अडथळा येतो ही बाब प्राचार्य व शिक्षकांच्या निदर्शनास आणुन दिली व तेंव्हापासून आमच्या शाळेला रविवार ऐवजी सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. त्या काळी रविवारी भरणारी आमची एकमेव शाळा असेल. धनंजय मध्ये असलेले नेतृत्वाचे गुण मी त्या काळीच अनुभवले होते. कै लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेले धनंजय मोठेपणी नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात आपले नाव लौकीक करतील असा माझा अंदाज आज खरा ठरलायं. अगदी शालेय जीवनापासुनच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्याची वृत्ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. शाळेत असतानाही त्याच्या अवतीभोवती मित्रांची नेहमीच प्रचंड रेलचेल असे, कारण सर्वांनाच तो आपला वाटायचा.जवळपास 30-32 वर्षापूर्वि धनंजय मुंडे व अनिल मुंडे (तेव्हा आम्ही त्यांना धनु-अनुची जोडी म्हणत असत) या दोघांनी गॅदरींग मध्ये स्टेज वर सादर केलेलं खुदगर्ज चित्रपटातील गीत - 'कुछ भी नही रहता, दुनिया में लोगो.. रह जाती है दोस्ती !! आजही जशाला तसे नजरेपुढे उभे राहते, अगदी बालवयापासुनच "सत्यम शिवम सुंदरम' चिंतनशिलतेतून तत्वांना प्राधान्य देत आयुष्य जगत असताना सर्व जग सुंदर करण्याच्या त्याच्या प्रयत्नामुळे त्यांचं जगणं हे बावनकश सोन्यागत वाटतं.

आज शोषीत, कष्टकरी, पिडीत, दिनदुबळ्यांचे कैवारी समाजात अभिमानाने मिरवतांना तो 'माझा विद्यार्थी आहे असे वाटत राहून उगीचंच उर अगदी अभिमानाने भरून येतो. म्हणून धनंजय बद्दल लिहीण्यासारखे, बोलण्यासारखे, सांगण्यासारखे खुप काही आहे. सत्पुरुषाला लागू होणारे सर्व गुण त्याच्याजवळ आहेत. 'विपत्काली धैर्य, प्रभुषणी संहिवं बरते. सभे पांडित्याचा , समरी शौर्य मिरवे ! प्रसार, सुकिर्तीच्या हाथी प्रचूर रती, विद्या व्यसन जे, ● तयाचे हे स्वाभाविक गुण सहा, सत्पुरुष जे !!अर्थात, संकटात धैर्याने वागणारा, सामर्थ्य असुनही संहिष्णुता जपणारा, सभेत व लेखनात चिंतनपूर्ण विचार मांडणारा, संघर्षाला शौर्याने सामोरे जाणारा, स्वत:च्या नावाला प्राणपणाने जपणारा आणि सदैव विद्येचे, ज्ञानाचे, समाज कल्याणाचे व्यसन असणारा हा धनंजय सत्पुरुषाच्या पदवीला नक्कीच पोहोचणारा आहे.राजकारणाचा वारसा असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला असल्याने राजकारणाचे बाळकडू त्याला सुरवातीपासूनच मिळाले होते. उच्च विद्या विभूषित असुनही सर्वांना सोबत घेवून चालण्याची त्याची वृत्ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.शाळेत असतानाही तो इतर मुलाप्रमाणेच सायकल रीक्षाने शाळेत येत असे. शिक्षकांसमोर तो कायम लाजरा बुजराच असायचा. स्कूल डे च्या दिवशी कोट व टाय घालून शिक्षकाची भूमिका पार पाडताना मी धनंजयला पाहिलयं.
आपले काका सक्रीय राजकारणात आहेत, आपल्याला राजकीय पाठबळ आहे असे त्याच्या वर्तनातून कधिही जाणवले नाही. एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याचे आचरण होते. दहावीचा रीझल्ट लागल्यानंतर प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्यामुळे आठवणीने आम्हा शिक्षकांना पेढे देवून वंदन करणारा धनंजय आजही माझ्या स्मरणात आहे. त्या वेळची 'धनु-अनु ची जोडी' म्हणजे धनंजय मुंडे व अनिल मुंडे मी आजही विसरलेलो नाही.


टापटीप राहणारा, सर्व शालेय व सहशालेय उपक्रमात हिरीरीने भाग घेणारा, मित्रांशी सहकार्याने रागणारा, कसलही गर्व अथवा अभिमान न करता सर्वांना सोबत घेवून चालणारा, खरे तेच माझे ही भावना जोपासणारा, आपली मते परखडपणे मांडणारा धनंजय मोठा होवून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा निश्चीतपणे उमटवेल असे त्या काळी वर्तवलेले माझे भाकीत आज खरे ठरलेले दिसतेय.15 जुलै हा धनंजय चा वाढदिवस साजरा करताना मला अतिशय आनंद होत आहे. धनंजय म्हणजे सर्वांनाच आपुलकी वाटणारं एक व्यक्तीमत्व आहे.तो खुप संयमी आहे. जय झाल्यास ते कधी हुरळून गेले नाहित किंवा पराजय झाला तर कधी खचले नाहित. मानवी समाज खऱ्या अर्थाने सुखी करायचा असेल तर बहुजनांचे दुःख, संकटे दूर झाली पाहिजेत म्हणजेच "बहुजन हिताय, बहुजन सुखाय या वचनाचे मर्म धनंजय ने जाणले आहे. शेवटी असे म्हणावे वाटते की, त्यांच्या या अमोध कार्याचा दीपस्तंभ भविष्यातील लाखों लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून अनंत काळापर्यंत प्रकाश देत राहील यात शंकाच नाही.

वाढदिवसाच्या निमित्ताने मा. ना. श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांना माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या, सर्व शिक्षकांच्या व समस्त मतदार संघातील नागरीकांच्या वतीने मी अभिष्टचिंतन करतो. साहेबांच्या जीवनात उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो, उदंड व निरोगी आयुष्य लाभो.. ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तर आहेतच परंतु नजीकच्या काळात त्यांना महाराष्ट्राच्या 'मुख्यमंत्री पदाच्या खर्चित बसलेले आम्हाला पहायला मीठो अशी आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

[टीप :- आदरणीय मा. ना. श्री. धनंजयजी मुंडे साहेब हे आज राज्याचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत याची मला जाणीव आहे. साहेब एके काळचे माझे विद्यार्थी असल्यामुळे माझ्या वरील लेखामध्ये आदरणीय साहेबांचा माझ्याकडून काही ठिकाणी एकेरी नाम उल्लेख झालेला आहे, याबद्दल मा-साहेबांनी व वाचकांनी मला माफ करावे. आपण समजून घ्याल ही अपेक्षा ]

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
धनंजयजी मुंडे यांचे शिक्षक (गुरुजी)

श्री रमेश कोमावार
मु.अ. तथा प्राचार्य
मिलिंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालय परळी वै.
9422244882-9421884982

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*ना.धनंजय मुंडे: सामान्य कार्यकर्त्यांचा जीव की प्राण*

       महाराष्ट्र राज्य सरकारमधील एक वजनदार मंत्री व जनसामान्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारा नेता म्हणजे ना.धनंजय मुंडे हे होत.आपल्या कर्तृत्व, दातृत्व व वक्तृत्व याचा संगम म्हणजे धनुभाऊ. दिव्यांचे प्रश्न सोडवुन त्यांनी नवा आयाम निर्माण केला आहे.आरोग्याच्या बाबतीत व कोरोनाकाळात त्यांनी केलेले काम एकमेवाद्वितीय आहे.ना.धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!
           स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने समाजातील विविध स्तरातील अनेकांचे नुकसान झाले. पण सर्वात मोठे नुकसान झाले ते राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचे! स्व. साहेब त्यांचे वाली होती, त्यांच्या पिचलेल्या आवाजाला सरकार दरबारी बुलंद करणारी वाणी होते. त्यांच्या अकाली निधनानंतर लाखोंच्या संख्येतील भोळा भाबडा ऊसतोड कामगार म्हणजे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एक मोठी संख्या आहे असे म्हणून अनेकांनी त्यांच्या नेतृत्व बनण्याच्या नावाने आपली दुकाने थाटली. पण आपली शक्ती दाखवण्यासाठी संख्या म्हणून वापर करण्याखेरीज कुणालाही काही ठोस करता आलं नाही. मागील भाजप सरकारने ऊसतोड मजुरांसाठी एक शासन निर्णय घाईघाईत केला होता, त्यातील एक डोक्यात संताप आणणारी योजना वाचून कुणालाही राग आला असता. ती अशी होती, की ऊसतोड मजूर ऊसतोडणी करन्यासाठी स्थलांतरित असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी अर्थसहाय्य! बरं झालं ते सरकार गेलं!नवीन सरकार मध्ये मंत्री होताच धनंजय मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांच्या नावाने असलेल्या महामंडळाचा कारभार आपल्या खात्याकडे घेतला. बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून या महामंडळास महाराष्ट्रात साखर उद्योग अस्तित्वात असेपर्यन्त निधी कमी पडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली. आमच्या या लाडक्या नेत्याला दीर्घ आयुरारोग्य लाभो हीच साईचरणी प्रार्थना !!!!!
          ✍️ - विशाल भडांगे*✍️
 •शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शिर्डी 
• ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र प्रमुख शिर्डी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------




-------------------------------------------------------------------------------------------------------------------------


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
_उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_

*15 जुलै ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन*
*परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान अबालवृद्ध बंधु भगिनींकरीता विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. यापूर्वी "आधार महोत्सव","स्वाभिमान महोत्सव" तसेच लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन "सेवासप्ताह" घेण्यात आला.यावर्षी 15 जुलै ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
            यावर्षी सर्वांनी कोरोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या लाटेत अतिशय बिकट परिस्थीतीचा सामना केला.अनेक जीवाभावाची व्यक्तीमत्वे कोरोनाने आपल्यापासून दुरावून नेली.विद्यमान परिस्थितिमध्ये देखील अनेकजण दवाखान्यात उपचारार्थ जावू शकत नाहीत,ही बिकट परिस्थिती आहे.त्यामुळे दोन्ही लाडक्या नेत्यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम "आरोग्य सेवा सप्ताह"आयोजित केला असून यात विविध आरोग्यविषयक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी ना.धनंजय मुंडे "अभिष्टचिंतन सोहळा" संजय गांधी निराधार योजनेच्या 1500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीच्या शिबीराचे उद्घाटन.शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध 100 भागात संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शुभारंभ. शनिवार 17 जुलै रोजी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर.रविवार दिनांक 18 जुलै रोजी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर.सोमवार दिनांक 19 जुलै रोजी दै.लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने "रक्ताचे नाते" या उपक्रमात महारक्तदान शिबीराचे आयोजन.मंगळवार व बुधवार दिनांक 20 व 21 जुलै रोजी सर्वांसाठी मोफत औषधीसह सर्वरोगनिदान शिबिर.गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा,आरोग्यसेवक व वृक्षमित्रांचा सेवागौरव तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम या उपक्रमाचा समावेश आहे.
        आरोग्य सेवासप्ताह मधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
_उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त_
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

••••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------------------

 विकासाचे महामेरू बहुत जनांशी अधारू... !
ना.धनंजय मुंडे विकासाचा ध्यास घेतलेले संघर्ष योद्धा! 
      राजकीय क्षितिजावरून पाहिले असता देशाच्या व राज्याच्या राजकारणात अगदी थोडकेच नेतृत्व असे दिसतात की ज्यांनी स्वतः अविरत जनतेच्या प्रश्नांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून आपल्या सततच्या संघर्षातून आपले लोकोपयोगी नेतृत्व उदयास आणले आहे.ना.धनंजय मुंडे हे त्यापैकीच एक होय.एखाद्या नेत्याला जनतेतून आमदार होण्यासाठी जनतेचे प्रश्‍न सोडवत अनेक वर्षे संघर्ष करावा लागणे हे फार अल्प वेळा घडत असते.ना.धनंजय मुंडे यांनाही थेट जनतेतून निवडून जाण्यासाठी पंचवीस वर्ष आपला सतत संघर्ष सुरूच ठेवावा लागला.जनतेचा विश्वास जिंकून,विश्वास सार्थ ठरवत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दनदनीत विजय मिळवला. आज ना.धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री असतानाही संघर्षाने अजूनही त्यांची पाठ सोडली नसली तरी धनंजय मुंडे यांचे नेतृत्व तेवढे कणखर बनल्याचे जाणवते.
        कोरोना व्हायरस या महामारीमुळे  संपूर्ण जगच हैराण-परेशान असतांना ना.धनंजय मुंडे हे राज्य तसेच बीड जिल्हा व परळीतील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.दिवंगत लोकनेते केंद्रीय मंत्री  गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासाठी स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मुंडे साहेबांचे नेतृत्व उदयास आणण्यासाठी मोठा हातभार लावला होता.ना.धनंजय मुंडे हे स्व. पंडित अण्णा यांचे सुपुत्र.


      राज्यात युतीची सत्ता येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब युती शासन काळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर परळी आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाची जबाबदारी स्व.पंडित अण्णांवर आणि धनंजय मुंडे यांच्यावरच   होती.त्यावेळी अगदीच अठरा-एकोणीस वर्षांचे तरुण असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी तरुणांची संघटनात्मक बांधणी युवा मोर्चाच्या माध्यमातून हाती घेतली.
       "शुद्ध बीजापोटी,फळे रसाळ गोमटी"अगदी याच प्रमाणे धनंजय मुंडे यांनी  आपल्या तरुण नेतृत्वाची चुणूक दाखवून तेव्हाचा रेणापुर वि.सभा मतदार संघ,परळी शहर व ग्रामीण भागासह बीड जिल्ह्यात शेकडो युवक शाखा उघडून तरुणांचे मार्गदर्शन करत,तरुणांचे आकर्षण केंद्र ठरले.यातूनच त्यांच्याकडे युवा आघाडीचे अनेक प्रमुख पदे चालून आली.पुढे त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पट्टीवडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. मध्यंतरीच्या काळात स्व.पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या संघटनात्मक कार्यामुळे मुंडे साहेब निश्चिंत असल्याचे जाणवत असे.यादरम्यान स्व.अण्णा व धनंजय मुंडे यांनी अनेक संकटांचा सामना करत बरेच आघातही झेलले. २००९ च्या मतदार संघ पुनर्रचनेत परळी विधानसभा हा मतदार संघ उदयास आला आणि स्व.मुंडे साहेबांनी लोकसभेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा परळी विधानसभेचे भाजपा उमेदवार म्हणून होऊ लागली.पण अचानक साहेबांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांचे नाव समोर आले आणि स्वतः पंडित अण्णांनी पंकजाताई यांची उमेदवारी घोषित केली.यामुळे धनंजय मुंडे समर्थक प्रचंड दुखावले गेले.कालांतराने धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेवर निवड झाली पण मुंडे कुटुंबात दुरावा वाढत गेला.
        जिल्हा परिषद,पंचायत समिती, २०१४ ची विधानसभा निवडणुक  असे एकामागून एक पराभव धनंजय मुंडे यांचे झाले.परंतु या पराभवाने ते डगमगले नाहीत. राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार येऊन देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात नामदार धनंजय मुंडे यांच्यावर खा. शरद पवार साहेबांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी निवड केली. इथूनच राज्यव्यापी नेतृत्वाची चुणूक ना.धनंजय मुंडे यांनी दाखवण्यास सुरुवात केली.'जनतेच्या प्रश्नांवर सरकारला सळो कि पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता,एक 'संघर्ष योद्धा' काय असतो हे ना. धनंजय मुंडे यांनी दाखवून दिले.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर परळी नगर परिषद, मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती,मार्केट कमिटी, ग्रामपंचायती,सेवा सहकारी सोसायट्या अशा विविध संस्थांच्या निवडणुकींत मोठ्या फरकाने विजय मिळवला.


        गेल्या दिड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर परळी मतदारसंघातील मतदारांनी पूर्वीचा रेणापुर व नवीन परळी मतदारसंघात तीस वर्षांपासून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळून राष्ट्रवादी च्या ना.धनंजय मुंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले.राज्यात सेना-भाजपाला स्पष्ट बहुमत असतांना शिवसेनेने भाजपा सोबत न जाता काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणे पसंत केले.(यात खा.शरद पवार साहेबांची महत्त्वाची भूमिका होती हे सर्वश्रुत आहेच)ना.धनंजय मुंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागून सामाजिक न्याय विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली.इथेही ना.धनंजय मुंडे यांची संघर्षमयी जीवनाने पाठ सोडली नाही.
      कोरोनाची महामारी व लाॅक डाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडून मजुरांना मजुरीही मिळेनाशी झाली.शेतकरी,कामगार अशा सर्वांवर उपासमारीची वेळ कोरणा मुळे आली."जोडूनिया धन उत्तम व्यवहारे,उदास विचारे वेच करी"..... "भूत दया गाई पशुचे पालन,तान्हेल्या जीवन वनामाजी"....
'संपत्ती आणि दया, वसती एके ठाई, तेथे जाण,धनंजया विभूति माझी"....
संतांच्या या वचनांप्रमाणे ना.धनंजय मुंडे यांनी कोरोना व लॉक डाऊन मध्ये अनेक वंचित घटक,शेतकरी,मजूर,कामगार,ऊसतोड कामगार यांना, परळी मतदार संघातील शहरांसह ग्रामीण भागात एक-एक वार्ड,एक-एक गल्ली आपल्या कार्यकर्त्यांकरवी अन्नधान्य,किराणा किटचे वाटप केले.जिल्ह्यातही वंचित घटक,ऊस तोड कामगार यांना जिल्हा परिषद व विविध संस्थांमार्फत अन्नधान्य,किराणा किट तसेच इतर मदत करण्याचे काम केले.जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी ना.धनंजय मुंडे अहोरात्र परिश्रम घेत आहेत.त्यांना अगदी कोरोना ने दोन वेळा गाठले तरी दवाखान्यात ऍडमिट असतानांही ते सर्वांची काळजी घेत होते.जनतेच्या आशीर्वादानेच ते अगदी थोड्याच दिवसांत या संकटातूनही बाहेर पडले.कोरोना व्हायरस व लाॅकडाउनमुळे शासनाच्या महसुली उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेला असतांनाही ना.धनंजय मुंडे हे बिड जिल्हा आणि परळी मतदार संघासाठी करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणत असून पंचवीस/पंधरा निधी,आमदार निधी, पालक मंत्री विकास निधी,नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समितींच्या वतीने आज शहर तशेच ग्रामीण भागात लाखो,करोडो रुपयांचे विकास कामे सुरु असून ना.धनंजय मुंडे यांच्या रूपाने विकास पर्वच सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते,बायपास, एम.आय.डि.सी,ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे सुरु असलेल्या   विकास कामांची यादी खुप मोठीआहे. (या विषयी ना.धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी विस्तृत माहिती देवू शकतील).


नगर परिषद गटनेते मा.वाल्मिक अण्णा कराड,जिल्हा परिषद गटनेते मा.अजयजी मुंडे,बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हे ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.जनतेचे  प्रश्न व अडी-अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारी एक उत्कृष्ट टिमच ना.धनंजय मुंडे यांच्याकडे असून ना.मुंडे व्यतिरिक्त कदाचित अशी टिम ईतर नेत्यांकडे असेल. कोरोना आणि लॉक डाऊनचा कार्यकाल सोडला तर ना.धनंजय मुंडे यांना भेटायला येणारी मोठी गर्दी असते.अगदी हजारो जनता त्यांच्या परळी येथील जगमित्र या कार्यालयात ना.धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी येते.व आपलं काम झाले म्हणून समाधान पावते.लॉक डाऊनच्या काळातही त्यांना शेकडो हजारो फोन केले जात आहेत हीच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.ना.धनंजय मुंडे हे जितके जनतेला व कार्यकर्त्यांना हवे-हवेसे असतात तेवढेच ते कुटुंब वत्सलहि आहेत.मुंडे कुटुंबातील करता माणूस म्हणून ते सर्वांची काळजी घेतात."घर असावे घरासारखे,नकोत नुसत्या भिंती।तिथे असावा,प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती।।" या प्रमाणे अगदी 'सुखनैव कुटुंबकम' कसे राहील या सह ते परिवारातील सर्वांची काळजी घेतात.ना.धनंजय मुंडे यांचे संघर्षमय जीवन पाहून म्हणावेसे वाटते की ज्या व्यक्तीला आपल्याला बसलेल्या चटक्यांची जाण असते,त्याच व्यक्तीला आपल्या मातीला व आपल्या माणसांना बसलेल्या चटक्यांचे भान असते.म्हणूनच अशी एखादी व्यक्ती ती कितीही मोठी झाली तरी त्यांचे लक्ष नेहमी आपली माती व आपल्या माणसांत लागलेले असते. अशाच प्रकारे ना.धनंजय मुंडे हे विकासाचे महामेरू,बहुत जनांसी आधारु....बनलेले आहेत.ना.धनंजय मुंडे यांच्या मंत्री रूपाने एक विकास पर्वच सुरू झाले असून (याविषयी आपण वर्तमानपत्रात पाहतच आहोत)परळी मतदार संघातील जनतेच्या ना.धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा लागलेल्या आहेत. त्या विषयी पुन्हा बोलू...असो आज ना.धनंजय मुंडे यांचे सुख व यश पाहण्यासाठी स्व.पंडितअण्णा आज हवे होते. 
ना.धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस त्यांच्या कार्याचा व संघर्षमय जीवनाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की,...."तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ,परम पद बळ वैराग्याचे".... 
ना.धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त 
हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.....
                   🌑
✍️अनंत गित्ते पांगरीकर.....✍️
मो.नं.९०९६७८७१३७

••••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------------------


टिप्पण्या

  1. जोशी साहेब, आदरणीय साहेबांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या पंक्तीत माझ्या सारख्या सामान्य परंतु साहेबांवर प्रेम असणाऱ्या व्यक्तीला संधी दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?