MB NEWS- व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून"

 व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून"



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      सर्व बाजूंनी  राखेची अवैध वाहतूक व त्यामुळे नागरिकांना भोगावा लागणारा त्रास हे परळी व परिसराचे नेहमीचेच दुखणे बनलेले आहे.प्रशासनाकडे सातत्याने कोणी ना कोणी याबाबत आपले गार्हाणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो.याबाबत उपाययोजना करायच्या सोडून परळीत पारंगत झालेले प्रशासनातील अधिकारी मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे या मुद्यावर सोयीची भुमिका घेताना नेहमीच दिसून येतात.आता तर पोलीस अधिकारी उघडपणे एक प्रकारे या उघड्या राखेच्या वाहतुकीचेही समर्थन करीत आहेत.ज्यांच्याकडे दाद मागावी तेच ग्रामीण पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"राखेची गरज आहे, अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून.योग्य ती कारवाई करू".नागरीकांनी आपलं म्हणणं मांडायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

        काही प्रसार माध्यमांनी उघड्या राखेच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आणला.त्यावर अधिकारी म्हणून अश्वस्त करायचे सोडून या मुद्यावर कळवळा आलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार  यांनी 'राखेची उपलब्धता व उपयुक्तता' यावर तत्वज्ञान सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट करुन म्हटले आहे की,"थर्मल मधील दोन्ही तलावातील मागील पन्नास वर्षापासून साठवून ठेवलेली राख संपलेली आहे. सध्या नवीन पडत असलेली राख ही ओली असून तेथे पूर्ण बंदोबस्त आहे. परळी शहराचे चोहोबाजूला वीटभट्ट्या हा काही लोकांचा लघुउद्योग आहे व त्यावर काही कुटुंबे अवलंबून आहेत. उन्हाळा असल्यामुळे बांधकामासाठी बऱ्याच जणांना विटांची आवश्यकता आहे.हे कोणीही नाकारू शकत नाही.वैयक्तिक यापूर्वी स्टॉक केलेली राख वीटभट्टीवर झाकून जात आहे. राख टाकाऊ वस्तु आहे. गौण खनिजात मोडत नाही. ज्या वाहनांमधून राख झाकून जात नसेल त्या वाहनावर आम्ही आवश्य कारवाई करतच आहोत.यात काहीच शंका नाही."

      पोलीस अधिकारी म्हणून नागरीकांची गार्हाणी ऐकुन समाधानकारक उत्तरे देणे निदान एवढे अपेक्षित असते. मात्र मुद्द्यावर प्रशासकीय अधिकारी यांनी अशी उत्तरे दिल्यास दाद मागायची कुठे असा प्रश्न निर्माण होतो.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !