MB NEWS:परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?(Reporter-महादेव शिंदे)

 परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?



*परळी वैजनाथ (महादेव शिंदे)...

शासनाने २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू केली तेव्हापासून आजतागायत राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु परळी शहरात कुठल्याही पान टपरी वर जा तुम्हाला गुटखा सहज मिळेल .शहरात अगदी लहान वयाची मुले सुद्धा गुटखा विक्री करताना सर्रास दिसून येत आहेत यावरून आता प्रश्न पडत आहे की खरंच गुटखा बंदी आहे का ?भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मृत्यू पावतात यामध्ये तोंडाचा कर्करोगाने  मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त आहे .तोंडाचा कर्करोग हा प्रमुख्याने तंबाखूजन्य पदार्थ ,गुटखा यामुळे होतो .परळीतील तरुण पिढी आज या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. शहरात या गुटखा विक्रिला आळा कधी बसणार? हा प्रश्न सुज्ञ लोक विचारत आहेत.

 *परळी शहर गुटखा विक्रीचे केंद्र बनत  चालले आहे*

परळी शहरांमध्ये बाहेर राज्यातून बोगस गुटखा,खर्रा, सुगंधी तांबाखू  छुप्या मार्गाने येते.शहरात गुटख्याचे बडे होलसेल चार-पाच व्यापारी असल्याचे बोलले जात आहे. हे व्यापारी परळी शहरातून  संपूर्ण जिल्ह्यात गुटखा पोहोचवत असल्याचे निदर्शनात  येत आहे गेल्या काही दिवसात covid-19 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउन दरम्यान परळी पोलिसांच्या डि.बी. पथकाने गुटख्याच्या दोन गाड्या पकडल्या होत्या मात्र तरीही या गुटखा माफिया ना आळा बसला नाही.यावरून परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनत चाललाय का? या गुटखा माफियांना कोणाचा वरदहस्त आहे? शहरात फोफावत चाललेल्या या अवैध व्यवसायाला कधी आळा बसणार ? यांच्यावर पोलीस कडक  कारवाई कधी करणार? हे प्रश्न निरुत्तरीत आहेत.

****************************

   कालच शहर डि.बी.पथकानी गाड्या चोरणार्या चोराला बेड्या घालत नऊ गाड्या ताब्यात घेतल्या त्याच प्रमाणे ह्या गुटखा माफीयाना धडा शिकवण्याची गरज आहे आशी चर्चा जनतेमधुन होताना दिसत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !