इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर*

 • *परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर*

_वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना सैनिक पाल्याचीही सृजनशीलतेत उत्तुंग भरारी_  •



परळीवैजनाथ, प्रतिनिधी..

    परळी वैजनाथ ही अनेक रत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रात येथील व्यक्तीमत्त्वे आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये परळीतील बालकं ही मागे नाहीत याचा प्रत्यय नुकताच आला असुन परळीतील नांदुरवेस भागातील मुळ रहिवासी असलेल्या परळीच्या केवळ १० वर्षे वयाच्या मुलाने जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर होण्याचा सन्मान पटकावला आहे.वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना तारांक आयाचित या सैनिक पाल्याने सृजनशीलतेत उत्तुंग भरारी मारुन जगभरात परळीचे नाव उज्ज्वल केले आहे.

     भारतीय सैन्यात कार्यरत असलेले परळीचे इंद्रजीत आयाचित सध्या लढाख मध्ये पोस्टिंगवर आहेत.चीन व भारत यांच्यातील तणावाच्या या परिस्थितीत त्यांच्या चौथीत शिकणाऱ्या १०वर्षाच्या मुलाने मोठा आनंद देत त्यांची छाती अभिमानाने फुलून येईल अशी कामगिरी केली आहे.तारांक इंद्रजीत आयाचित सध्या अहमदाबाद येथील  आर्मी पब्लिक स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकतो. व्हाइटहॅट जूनियर ही एक मुंबईतील एडटेक स्टार्टअप आहे. ज्यामध्ये तरुण मुलांना कोडिंग शिकवण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी (वय 6 ते 18) ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रोग्रामिंग शिकण्यास तयार केले जाते आणि त्यानंतर गेम, अ‍ॅनिमेशन आणि अनुप्रयोग (अॅप्स) तयार करण्यास प्रोत्साहित केले जाते. यामध्ये मुलांना स्वतचे क्रियेशन करुन प्रझेंटेशन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

       व्हाइटहॅट जूनियर व्यासपीठावरील पहिल्या 15 मुलांना त्यांच्या स्वत: च्या स्टार्ट-अप्स तयार करण्यास आणि त्यांना फेलोशिप प्रदान करण्यास मदत करते.तसेच सिलिकॉन व्हॅली भेट घडवली जाते.या चॅलेंज मध्ये तारांक आयाचित याने स्वत:ची छाप पाडली असुन तो जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर ठरला आहे. सृजन (क्रियेटिव्हिटी) क्षेत्रात त्याने कमी वयात बुद्धिमत्ता व प्रतिभा सिद्ध केली असुन जागतिक स्तरावर परळीचे नाव उज्ज्वल केले आहे.त्याच्या या उत्तुंग भरारी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणार्या भारतीय जवान इंद्रजीत आयाचित या बापाच्या डोळयात मात्र आपल्या चिमुकल्याच्या यशाने आनंदाश्रु तरळून निघाले आहेत. आपल्या मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रियाइंद्रजीत आयाचित यांनी व्यक्त केली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या