MB NEWS-इंग्लंडमधील इंजिनीअरच्या हाती गडदेवाडी ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण - सुशांतसिंह बळीराम पवार

 इंग्लंडमधील इंजिनीअरच्या हाती गडदेवाडी ग्रामपंचायत 



गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण - सुशांतसिंह बळीराम पवार



परळी (प्रतिनिधी): ग्राम पंचायत निवडणूकीत परळी तालुक्यातील गडदेवाडी या ठिकाणी सुशांतसिंह पवार या युवकाने सात पैकी चार जागा जिंकत गावची पंचायत ताब्यात घेतली.इंग्लंडमध्ये आपले कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास घेत सुशांतसिंहने ग्राम पंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली.त्यांचे वडील हे सेवानिवृत्त आय.ए.एस.अधिकारी आहेत.सर्वदूर असलेल्या परिचय आपल्या गावाच्या कामाला यावा हा ध्यास सदैव मनात घेऊन त्यांचे कार्य सुरू आहे.


आजकाल युवकवर्ग राजकाणापासून दुरवरहिलेला पहायला मिळतो.मात्र आजच्या काळात राजकरण व समाजकारण यांचा समतोल साधला तरच विकासाचा मार्ग मिळतो.हाच ध्यास मनात ठेवत अनेक ग्राम पंचायत युवकांच्या ताब्यात गेल्या. बीड जिल्ह्यातील गडदेवाडी ता.परळी या ठिकाणी

हेच चित्र पहायला मिळाले.इंग्लंड मधील नॉटींगहॅम येथे चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह पवार याने गडदेवाडीमध्ये ग्रा.पं. निवडणूक लढवली. निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली.गावातील जनतेनी परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त १ मताच्या फरकाने सुशांतसिंह बळीराम पवार विजयी झाले. 


वडिल बळीराम पवार हे आय.ए.एस. अधिकारी असून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे.मोठे कुटुंब असताना केवळ आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सुशांतसिंह यांनी गावात येवून पॅनल उभा केला.सात पैकी चार सदस्य निवडून आले. 

गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण फेडणार असल्याचे ते म्हणाले.


 - या मुद्द्यांवर करणार काम - 


मी सगळीकडे फिरलो परंतु माझे गाव आजही विकापासून दुर आहे.उसतोड कामगारांची संख्या जास्त आहे आहेत.गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहोत.२०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. त्याची मी अंमलबजावणी करणार. वृध्द लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईतला मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे असे सुशांतसिंह यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार