इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विजेच्या पोलवर करंट उतरला; सहा वर्षीय मुलीचा मृत्यू ! महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावल्याची नातेवाईकांची संतप्त भावना

 विजेच्या पोलवर करंट उतरला; सहा वर्षीय मुलीचा मृत्यू !



महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावल्याची नातेवाईकांची संतप्त भावना

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      

        महावितरणच्या गलथान कारभाराचा नमुना नेहमीच बघायला मिळतो परंतु या गलथान कारभारतून एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना आज दिनांक 9 रोजी दुपारी 03:45 च्या सुमारास घडली आहे. या घटनेने नागरिक संतप्त झाले असून वारंवार सांगूनही करंट उतरणाऱ्या पोलची दुरुस्ती केले नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

       याबाबत प्राप्त माहिती अशी की, महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीब पुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले. या भागातील नागरिक नेहमी या खांबा पासून दूर राहत असत मात्र आज अतिशय दुर्दैवी घटना घडली असून या भागातील एक छोटी सहा वर्षीय मुलगी या खांबाला संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गौरी वैजनाथ घोटकर,वय ६ वर्षे असे या मयत मुलीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची चीड नागरिक व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!