MB NEWS-गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

  गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन -

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 

परळी दि. १ फेब्रुवारी....

 कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कार २०२१-२२ साठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे अर्ज मागविण्यात येत आहे. विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सदर पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

 मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेत स्थळावर तसेच कामगार कल्याण केंद्रात सदर पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकान, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स,  उपहारगृहे, बँका आदी मध्ये काम करणारे कामगार/कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगारांची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. ५१ कामगारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून रु. २५००० हजार,  स्मृतिचिन्ह,  आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या दहा वर्षानंतर कामगार भूषण पुरस्‍कारासाठी अर्ज करता येतो.  एका कामगाराची या  पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून रु. ५०००० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 मंडळाचा लीन नंबर (लेबर आयडेंटिटी  नंबर) असलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या  संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे.

 त्या आधारे अर्जदारास संबंधित केंद्राकडून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल.  सदर अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत हस्तपोच किंवा टपालाने सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील तीन वर्षात बंद पडलेल्या आस्थापनातील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाइन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार