MB NEWS-विषबाधा:दोन मुलींचा मृत्यू तर आई व भाऊ यांची प्रकृती चिंताजनक

  विषबाधा:दोन मुली व एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक



अंबाजोगाई, प्रतिनिधी..

    जेवणातून विषबाधा झाल्याने दोन मुलीचा मृत्यू झाला तर आई व भावाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना समोर आली होती. उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू झाला आहे. यामुळे या घटनेत दोन मुली व एक मुलगा मृत्यूमुखी पडले आहेत.

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी परिसरात राहणारे काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुली साधना (वय ६) आणि श्रावणी (वय ४) यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (दि. २६) सकाळी घडली. तर, पत्नी भाग्यश्री (वय २८) आणि मुलगा नारायण (वय ८ महिने) यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि. २५) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. नागझरी परिसरात राहणाऱ्या धारसुरे कुटुंबासाठी आजचा दिवस काळोख घेऊन आला अंड्याची शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील दोन मुलींनी जागीच जगाचा निरोप घेतला तर आई व आठ महिन्याचा मुलगा रूग्णालयात उपचार घेत असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. यादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दोघी बहिणींना डॉक्टरांनी मृत घोषित केले आई व आठ महिन्याच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेतअशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जाधव यांनी दिली आहे.

Click:-*बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण*

Click:-*बीडमध्ये गोळीबार.....* _जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या_

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार