MB NEWS-कोरोनाने कोंडमारा: जीवनाचा झाला रहाट पाळणा अन् तीन वर्षांपासुन जगण्याची सर्कस !

कोरोनाने कोंडमारा: जीवनाचा झाला रहाट पाळणा अन् तीन वर्षांपासुन जगण्याची सर्कस !



कोरोनामुळे महाशिवरात्रीत आनंद देणार्या 36 कुटुबांची तीन वर्षापूर्वी जगण्यासाठी धडपड

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛





परळी वैजनाथ, महादेव शिंदे..........

      परळी शहरात 2020 साली महाशिवरात्र यात्रा महोत्सवात करमणुकीसाठी आलेल्या रहाट पाळना, ब्रेकडान्स, नाशिक ड्रॅगन,नावडी,बाऊन्सी,स्लायबो,लहान मुलांचे चक्री अशा चार व्यावसायीकांच्या व्यवसायाचे साहित्य अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे तीन वर्षांपासुन एकाच जागी खिचपत पडले आहे.आपल्या कलेद्वारे अबालवृध्दांचे अबालवृध्दांना आनंदी ठेवणार्या व्यावसायीकांसह 36 कामगारांचे आयुष्य जीवन जगण्याच्या धडपडीत सर्कस बनले आहे. यावर्षीच्या महाशिवरात्र यात्रेत व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली नाही तर हे सर्व कुटुंब उध्वस्त होतील.प्रशासन व वैद्यनाथ देवल कमेटीने किमान परळीत साहित्य असलेल्या चार व्यवसायीकांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मात्र कुणीच पुढे येत नसल्याने 36 कुटुंबाचे भविष्य अंधारमय झाले आहे.

     


   


⭕ *पाचपट कमाईसाठी पाडणार होते पैशांचा पाऊस ; पाच लाखांचा गंडा सहन करुन करुन फिटली हौस*

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या परळी नगरीत महाशिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.शेकडो वर्षापासून महाशिवरात्र काळात लोककला,खेळण्याचे साहित्य,रहाट पाळणे,अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ,सर्कस अशा दुकाने व मनोरंजनाच्या उपक्रमांनी अनेक दिवस महोत्सव साजरा होत असे.सन 2020 साली महाशिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना 22 मार्च 2020 रोजी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये परळी शहरात महोत्सवात व्यवसाय करण्यासाठी आलेल्या रहाट पाळने,ब्रेक डान्स,ड्रॅगन,नावडी,बाऊन्सी,स्लायबो,लहान मुलांचे चक्री असे साहित्य आहे त्याच जागी राहिले.या सहित्याबरोबरच यावर उपजिविका असलेल्या 36 कामगार  कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष सुरु झाला.तर व्यवसाय उभा करणारे मालक कर्जबारी होवुन ठेवलेल्या सामातील पत्रे काढुन निवारा तयार करत ऊन,पाऊस,वादळ,थंडीचे कडाके अंगावर झेलत तीन वर्षापासुन एकाच ठिकाणी स्थानबध्द झाल्यासारखे जीवन जगत आहे. 



        परळीतील अमर मैदानावर रमेश अंबादास बावणे रा.खामगाव,महंमद रा.बुलढाणा,बाळु राऊत,अरुण आगाशे रा.अकोला यांचे हे विविध प्रकारचे सामान आहे.रहाट पाळण्याचे अँगल,इंजिन,खुर्च्या,चैन,ड्रॅगन चे रबरी साहित्य,लोखंडी नाव असे साहित्य वापराअभावी गंज धरत आहे.लॉकडाऊनमध्ये परळी अडकून पडलेले हे साहित्य लॉकडाऊन उठल्यानंतरही यात्रेस बंदी असल्याने परळीच आहे.



@@@@@

पोटासाठी करतात हाती पडेल तो व्यवसाय

 यात्रा महोत्सवात आलेल्या यात्रेकरुंचे मनोरंजन करणारे आपल्यातील जादुई कलेने सर्वांना खुष करणारे हे कलाकार रोजी रोटी साठी गवंडी काम,हमाली,भाजीपाला विकुन या वर्षीच्या महाशिवरात्र महोत्सवात तरी आमचा व्यवसाय सुरु होईल या आशेने पोटाची भुक भागवत आहेत.






आवर्जून बघा:-🎇 *सरपंच प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण; 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट क्रिकेट स्पर्धा- ना.धनंजय मुंडे

@@@@@@

 दागिणे विकले,कर्जबाजारी झालो 

अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे आमचा व्यवसायच नाही तर जीवन ठप्प झाले आहे.आम्ही सामुहिकरित्या उभारणी करुन आपापला व्यवसाय करत आहोत.लॉकडाऊनमुळे आम्हाला मिळणारा रोजगार तर बुडाला आहेच परंतु या व्यवसायात आमच्यासोबत काम करणार्या कामगारांना पैसे देण्यासाठी आमच्या महिलांचे दागिणे मोडले.खाजगी सावकरांकडुन कर्ज घेतले.परळी येथे माझ्यासह चौघांचे दिड ते दोन कोटी रुपयांचे साहित्य असुन मागील तीन वर्षात व्यवसाय बंद असल्याने 30 लाख रुपयांचे आमच्यावर कर्ज झाले आहे.

 - अरुण आगाशे, ड्रॅगन खेळणी मालक



@@@@@@

पुर्वी सर्कशीत दुचाकींच्या कला आता भटकंती

 परळीत असलेल्या साहित्यात सर्कशीचे काही साहित्य आहे.पुर्वी मी यात्रेतील मौत का कुआ या प्रकारात दुचाकी चालवून मनोरंजन करायचो यावर माझ्या कुटुंबाचा चरिथार्थ भागायचा तीन वर्षांपासुन यात्रा बंद असल्याने आमचा रोजगार बंद असुन मी व माझी पत्नी जानकाबाईसह परळीतील साहित्य सांभाळत आहोत.खाण्यासाठी राशन मिळते परंतु दवाखाना व इतर गरजेसाठी मिळेल ते काम करत आहोत.हाताला काम मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

 - राजु त्र्यंबक घुले, रा.तांदळेवाडी जि.जळगाव

  • ----------------------------------------------------------•

MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.
आपल्या सुचेना,काॅमेन्टस्, मार्गदर्शन व पाठबळ प्रार्थनिय.
       🎇 हे देखील वाचा🎇

दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

------------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                           ---------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?