MB NEWS-परळीत संत श्री रविदास जयंती उत्साहात साजरी जातीयभेद नष्ट करून‌ सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत रविदासांनी दिली - रविंद्र परदेशी

  परळीत संत श्री रविदास जयंती उत्साहात साजरी 

जातीयभेद नष्ट करून‌ सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत रविदासांनी दिली - रविंद्र परदेशी



परळी वैजनाथ - दि १६ ( प्रतिनिधी ) :- समाजा समाजामध्ये पसरलेले जातीभेदाचे विष नष्ट करून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत श्री रविदासांनी दिली. त्याचा बोध घेऊन समाज कार्य केले तर खऱ्या अर्थाने संत श्री रविदास यांची जयंती केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी यांनी केले.

🔸MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

आज शिवाजीनगर या ठिकाणी संत श्री रविदासांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी रवींद्र परदेशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते संत श्री रविदासांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैजनाथ सोळंके, शिवसेनेचे राजाभैया पांडे, भोजाजी पालीवाल, सतिश जगताप, सचिन स्वामी, राष्ट्रवादीचे बालाजी चाटे, रामेश्वर महाराज कोकाटे, जालिंदर नाईकवाडे, महेंद्र रोडे आदी उपस्थित होते

. 🔸 आवर्जून वाचा:कोविड परिस्थितीमुळे स्थगित राहिलेले संत रविदास पुरस्कार यावर्षी घोषित करणार-धनंजय मुंडे

शिवाजीनगर भागात आज तागायत प्रत्येक स्तरातील सामाजिक उपक्रम राबवण्यात येऊन कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याची शिकवण दिली जाते आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाज प्रबोधन केले जाते याचा अनेकांना फायदा होतो यापुढेही असेच कार्यक्रम राबवण्यात येऊन ह्या भागात समाज प्रबोधनाचे काम तह्यात सुरूच ठेवण्यात येतील अशी ग्वाही देखील रवींद्र परदेशी यांनी दिली.

आवर्जून वाचा: धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बदलणार परळी वैजनाथ बसस्थानकाचे रुपडे.

सध्याच्या बदलत्या युगात खऱ्या अर्थाने बिघडलेली सामाजिक खऱ्या अर्थाने सुधारण्यासाठी संत श्री रविदासांचा संदेश समाजा समाजात पोहोचवणे‌ ही काळाची गरज आहे त्यादृष्टीने प्रत्येकाने समाजकार्यासाठी वाहून घ्यावे असे मौलिक विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

🔸MB NEWS ला Subscribe नक्की करा.

ह्याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ आणि महिला-पुरुष भाविक भक्तांनी घेतला.

कार्यक्रमास विजय अटकोरे, शिवराज सुरवसे, पवन वाघमारे, जगन परदेशी, सुभाष परदेशी, तुळजा परदेशी, राजन परदेशी, सुनिल परदेशी, धर्मेंद्र परदेशी, दिलीप कुरील यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार