MB NEWS-परळी-परभणी रुटवर रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू

  परळी-परभणी रुटवर रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू



परळी/प्रतिनिधी

परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन अंतर्गत रेल्वे ट्रॅकवरील विद्युतीकरणाचे काम सध्या चालू असून परळीपयर्ंंत लवकरच काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वे गतीने धावणार असून या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढण्यासोबत लांब पल्याच्या गाडयाही सुरू होवू शकतात.

परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन अंतर्गत रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येत असून नरसिंह पोखर्णी पासून पुढे सध्या काम चालू आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेची गती वाढणार असून रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

मिरज रेल्वे सुरू करा

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून परळी-मिरज-परळी ही रेल्वे बंद करण्यात आली असून सुमारे दोन वर्ष रेल्वे बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंढरपुर, कुर्डवाडी-मिरज या ठिकाणी जाण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त असून मिरजहून पुढे अनेक ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेची कनेक्टीव्हीटी उपलब्ध होते.

टिप्पण्या

  1. परळी - मिरज या गाडी सोबतच परळी - पूर्णा ही गाडी देखील लवकरात लवकर चालू होणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Ok.. याची पण बातमी नक्की करुन.आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. छान एम बी न्यूज परळीत अल्पावधीत नाव झाले एम बी न्यूज चे मुख्य संचालक प्रा रविंद्र जोशी सरांचे मनःपुर्वक आभार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार