🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर*
• _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_
उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.
तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचा सप्ताह (कॅम्प) चे सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.25 ते 27 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे तर अध्यक्षस्थानी ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुरेश शेजुळ व नारब तहसीलदार बाबुराव रूपनर हे आहेत. गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा जनतेस सहाय्य व्हावे करिता राशन कार्ड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे वेळेस जुने राशन.कार्ड सोबत आणावे व ज्यांचे नाव कमी किंवा लावायचे आहेत त्यांनी घरातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड सोबत ठेवावे. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (9822280568) यांनी दिली आहे.
••••••••••••••••••••••••••••••••
🔸हे देखील वाचा/पहा🔸
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके
Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*
Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*
Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*
Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*
12 अंकी नंबर भेटल्यास त्याचा वर राशन भेटणार का
उत्तर द्याहटवाहो...अधिक माहितीसाठी डॉ.संतोष मुंडे यांना संपर्क साधावा.
हटवा