नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS- 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर* • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_

 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर*



 • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_ 


उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. 



                        तालुक्‍यातील फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचा सप्ताह (कॅम्प) चे सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.25 ते 27 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे तर अध्यक्षस्थानी ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुरेश शेजुळ व नारब तहसीलदार बाबुराव रूपनर हे आहेत. गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा जनतेस सहाय्य व्हावे करिता राशन कार्ड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे वेळेस जुने राशन.कार्ड सोबत आणावे व ज्यांचे नाव कमी किंवा लावायचे आहेत त्यांनी घरातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड सोबत ठेवावे. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (9822280568)  यांनी दिली आहे.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


































टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या