परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सरपंचांनी लोकसेवक म्हणून गावाच्या विकासासाठी काम करावे -जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार
टोकवाड येथे सरपंचांची कार्यशाळा उत्साहात संपन्न
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
सरपंच हे खूप मोठे पद असून विकासात्मक बदलासाठी या पदावरील व्यक्ती गावाचा कायापालट करू शकते. खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून सरपंचांनी गावाच्या विकासासाठी काम करावे असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. टोकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंचांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
टोकवाडी येथे सरपंचांची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे, पंचायत समिती परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, पंचायत समिती माजी सभापती बालाजी मुंडे,वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे, इंजिनीयर चांदवडकर आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी "माझा गाव सुंदर गाव" या विषयाचा आराखडा सरपंचासमोर मांडला व या आराखड्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
क्लिक करा व वाचा: 🌑 *अंबा कारखाना रोडवर भीषण आपघात;मोठी जिवीतहानी*
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जि प मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सरपंचांनी गावाच्या विकासासाठी विविध योजनांचा वापर करून तसेच लोकसहभागातून कशी कामे केली जाऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी सरपंचांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. या सरपंच कार्यशाळेला विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला पंचायत समिती परळी चे विस्ताराधिकारी गुळभिले, स्वच्छ भारत मिशन चे दुबे ,टोकवाडीच्या सरपंच सौ गोदावरी राजाराम मुंडे, ग्रामसेविका रांजणकर मॅडम, बळवंत, क्षीरसागर, आदींचीची प्रमुख उपस्थिती होती.तसेच इंजिनीयर सय्यद, उपसरपंच सौ उषाताई रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, लहुदास मुंडे, सौ कल्पना मुंडे, संतोष मुंडे, साहेबराव रोडे, जि प प्रा शाळेचे शिक्षकवृंद, वरद गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजाराम मुंडे यांनी केले.
🔸 *अजित पवारांनी दिला टोकवाडीत सहा तासांचा वेळ..*
दरम्यान, टोकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी अतिशय अनमोल असा आपला सहा तासाचा वेळ दिला. त्याचप्रमाणे कार्यशाळेत सरपंचांचे प्रश्न व कार्यक्रम यावर लक्ष देऊन उपक्रमांचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी केली. टोकवाडी येथे झालेल्या विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली तसेच जिल्हा परिषद शाळेचे आकर्षक असे रूप बघून त्यांनी भरभरून कौतुक केले व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सुरुची भोजन प्रसंगी त्यांनी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था नाकारून सर्व सरपंचांच्या सोबत पंक्तीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला. एखाद्या वरिष्ठ अधिकार्याने दाखवलेल्या अत्यंत साधेपणाच्या वर्तणुकीने सर्वांनाच व उपस्थित सरपंचांना ही अतिशय कौतुक वाटले.
हे देखील वाचा/पहा🔸
क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*
क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*
क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*
क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा