MB NEWS-रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज

 रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज    



  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात व मनात दूषित विचार येत नाही असे श्रीक्षेत्र कपिलधार येथील शिवाचार्य विरुपाक्ष महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले                                    वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 18जुलै सोमवारी सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम  यांचे प्रवचन झाले .सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती.रुद्राक्ष धारण इष्टलिंग पूजनाची तसेच कपाळी भस्म लावण्याचे महत्त्व काय असते ते सउदाहरण विवेचन केले .      

Click &watch     ■ *परळीतील बेलवाडीत आषाढ मास अनुष्ठान: वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तीमय* *_ |MB NEWS|Subscribe| like|Comments_*      

 संत शिरोमणी श्री मन्मथ माऊली यांनी म्हटल्याप्रमाणे भावी भस्म लिंग गळा! शोभे रुद्राक्षांच्या माळा !!  ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ,कपाळावर भस्म  आहे,मुखी शिवनाम आहे,  फळ रुद्राक्ष धारण करणाऱ्याला मिळते तसेच रुद्राक्षाची जपमाळा प्रत्येकाची वेगळी असावी आज प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसतो त्याप्रमाणे सर्वांनी नामस्मरण केले तर ते दृश्य किती सुंदर व वैभवशाली असेल याची कल्पना सुखावह आहे.वीरशैव कुळात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचे भाग्य थोर आहे, त्यांनी आपले आचरण वरील प्रमाणे ठेवावे असे आवाहन गुरूवर्य यांनी केले. तदनंतर आरती होऊन सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार