MB NEWS- देशात राबविला जात असलेला हर घर तिरंगा उपक्रमाची सुरूवात करणारी परळीची विद्यार्थिनी: कृतिशील युवती

 या युुवतीने गेल्या वर्षीच स्वयंस्फूर्त हाती घेतला होता 'हर घर तिरंगा' उपक्रम



_पंतप्रधानांना पत्राद्वारे दिली होती 'हर घर तिरंगा' सह 75 कृतियुक्त संकल्पनांची यादी_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून हर घर तिरंगा या उपक्रमाने यावेळी  स्वातंत्र्य दिन राष्ट्र अस्मितेसह साजरा केला जाणार आहे. देशात घराघरात पोहोचणारा हा उपक्रम परळी जवळच्याच देशमुख डिघोळ येथील एका मुलीने गेल्यावर्षी पंतप्रधानांना पत्र लिहून सुचवला होता. त्याचप्रमाणे तिने गेल्या वर्षीच स्वतः स्वयंस्फुुर्तिने हा उपक्रम स्वतःच्या घरापासून सुरू केला होता आणि आज हाच उपक्रम देशभरात राबवला जात आहे हे विशेष.

       परळी शहरात शिक्षण घेतलेली व सर्वपरिचित विद्यार्थिनी कु.मंजुश्री सुर्यकांत घोणे ही नेहमीच विविध कृतिशील व रचनात्मक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते. सोनपेठ तालुक्यातील देशमुख डिघोळ येथील ती रहिवासी आहे. चांगली वक्ता व प्रतिभावान व्यक्तिमत्व असलेली ही विद्यार्थिनी विविध क्षेत्रात नेहमीच आपला ठसा उमटवत आली आहे. मंजुश्री घोणे हिने गेल्या वर्षी 2021 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 कृतिशील संकल्पनांची यादी सुचवली होती. एवढेच नाही तर गेल्या वर्षभरापासून तिने व्यक्तिगत पातळीवर एक एक उपक्रम स्वतः सुरूही केला होता. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी तिने सुचवलेल्या या उपक्रमांपैकी हरघर तिरंगा उपक्रम तिने स्वतःच्या घरापासून सुरू केला होता. आपल्या कुटुंबीयांसमवेत गतवर्षी आपल्या घरी तिरंगा फडवत स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. तसेच स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला गेला पाहिजे असे तिने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात सूचित केले होते. योगायोगाने हा उपक्रम आता संपूर्ण देशात राबवला जात आहे. कु. मंजुश्री घोणेने सुचविलेल्या कृतिशील उपक्रमांमधील हा उपक्रम देश पातळीवर राबवण्यात येत असल्याचा तिला व तिच्या कुटुंबीयांना अतिशय आनंद वाटत आहे. एका मुलीने सुचविलेला व स्वतःपासून सुरू केलेला उपक्रम आता देशाच्या प्रत्येक घराघरात राबविण्यात येत आहे हे विशेष म्हणावे लागेल.

-------------------------------------------------------

------ MB NEWS ने 2021 मध्ये प्रकाशित केलेली बातमी 👇👇👇👇👇

 

गेल्यावर्षीची बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
----------------------------------------------------------

मंजुश्री घोणे हिने गतवर्षी स्वतःच्या घरी राबवलेला 'हर घर तिरंगा 'उपक्रम >>>>>संग्रहित छायाचित्रे 👇👇





----------------------------------------------------------

मंजुश्रीने गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुचविलेले उपक्रम..... पंतप्रधानांना पाठवलेला ईमेल....👇👇👇👇

----------------------------------------------------
*मंजुश्री बनली होती एक दिवसाची राजस्थान राज्याची मुख्यमंत्री....*
      मंजुश्रीला लहानपणा पासून विविध स्पर्धेत सहभागी होण्याची आवड होती जी आजही तिने जोपासली आहे. मंजुश्री कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. वेकअप महाराष्ट्र या संस्थेचे सत्यजीत तांबे यांच्या वतीने मै भी नायक, या स्पर्धेचे आयोजन युवकांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेतून मंजुश्रीची राजस्थान या राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. २ ऑक्टोबर २०१९ ला जयपूर येथे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याची संधी मंजुश्रीला मिळाली होती.


--------------------------------------------------------

- video news-


--------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

Video News :



-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

------------------------------------------------------













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !