MB NEWS-कृषिमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत बस स्थानकासमोर जळला पुतळा

 कृषिमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत बस स्थानकासमोर जळला पुतळा 



        अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 


        राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल खालच्या स्तरावर राज्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात या वक्तव्याचा निषेध होत आहे वक्तव्याच्या  निषेधार्थ आगडोंब उसळला अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेते व कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर कृषिमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून जोडा मारो आंदोलन करत निषेधाच्या घोषणा देत पुतळा जाळण्यात आला.


click:- *लक्षवेधी: छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे?*


            राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली सर्व पक्षीय विरोध होत असल्याचे पाहून सत्तार यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेत माफी मागत आपण कोणाचाही अनादर होणार नाही असे म्हटले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज राज्यभर कृषीमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला जात आहे अंबाजोगाईतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून जोडा मारो आंदोलन करण्यात आले कृषिमंत्री सत्तार यांच्या बेताल वक्तव्यानंतर सर्वात प्रथम सोशल मीडियावर निषेध करत असल्याचा व्हिडिओ केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अपलोड केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्तार यांचा पुतळा बनवण्यापासून 50 खोके व त्यावर 50 खोके एकदम ओके अशा घोषणा चिटकून सर्व तयारी करण्याची जबाबदारी माजी आमदार साठे यांनी पार पाडली याला म्हणतात पक्ष नेतृत्व निष्ठा अशीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात चर्चा सुरू होती


       बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला जोडा मारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे संजय भाऊ दौंड माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी डॉ नरेंद्र काळे शिवाजी शिरसाठ राजेश्वर चव्हाण बालाजी शेरेकर प्रमोद भोसले अजीम जरगर किशोर परदेशी संतोष शिंगारे दिनेश भराडीया,महादेव आदमाने, शेख ताहेर , बालासाहेब शेप बबनराव लोमटे अमोल लोमटे सुनील वाघाळकर अकबर पठाण दत्ता सरोदे सिद्धू लोमटे तानाजी देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !