MB NEWS-परळीत आपले वाहन पार्क करताना सावधान !

 परळीत आपले वाहन पार्क करताना सावधान ! 


 हॉटेलमध्ये जेवून येईपर्यंत तुमचे वाहन होऊ शकते गायब

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         परळी शहरातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असून दैनंदिन वाहन चोरांच्या मोठ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपले वाहन एखाद्या हॉटेल बाहेर किंवा रेस्टॉरंट बाहेर किंवा एखाद्या दुकानासमोर, ऑफिस समोर पार्क करत असताना सावधानता बाळगण्याचे दिवस येऊन ठेपले आहेत. कारण घटनाच अशा घडत आहेत की आपली मोटरसायकल किंवा तत्सम वाहन हॉटेल बाहेर लाऊन सुखाने चार घास खावे या उद्देशाने गेलेल्या व्यक्तीला हॉटेलमधून जेवण करून बाहेर आल्यानंतर आपली मोटरसायकल पार्क केलेल्या जागेवर दिसून येत नाही.  अशा वाहन चोरीच्या घटना शहरात सातत्याने सुरूच आहेत.


     परळीतील सर्वपरिचित पत्रकार मोहन भागोजीराव व्हावळे रा. इंदिरानगर परळी वै  हे दिनांक 08/11/ 2022 रोजी रात्री9.20 वाजण्याचे सुमारास  मोटारसायकल क्र MH-44 N8335 ही हिरो कंपनीची काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली हॅन्डल लॉक करून रेल्वेस्टेशन परिसरातील एका हाॅटेलमध्ये  मित्रासह रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवण करुन  बाहेर आले तेव्हा  मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. आजुबाजुला  शोध घेतला ती मिळुन आली नाही. त्यानंतर  त्याच रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन आनोळखी इसम मोटारसायकल घेउन जात असताना  दिसले.  मोटार सायकल कोणीतरी आज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडुन चोरुन नेली. हिरो कंपनीची काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली जीचा पासींग क्र MH-44 N 8335 व चेसीज नं. MBLHA11ATF9L21603 व इंजीन नं. HA11EjF938892 अशा वर्णनाची जुनी वापरती किं.अं 30,000/- रु कोणीतरी आज्ञात चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडुन चोरुन घेवून गेला म्हणुन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास हे.काॅ.विष्णु सानप हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार