इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-चोरांपुढे परळी पोलीसांचा वचक संपला

 चोरांपुढे परळी पोलीसांचा वचक संपला : घरफोड्या, वाहन चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ



शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बनली शोभेची...!


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          परळी शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असूनपरळी शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्याचे सत्र भीतीदायक बनले असून कोणत्याही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान चोरीच्या घटनांतून आता पत्रकारही होरपळून निघत आहेत. संपादक मोहन व्हावळे यांची मोटारसायकल रेल्वे स्थानक परिसरातून चोरीस गेल्याची घटना घडली आहे.


      पीसीएनचे संपादक, पत्रकार मोहन व्हावळे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 44-N-8335 परळी  रेल्वे स्टेशन वरून दि. 8 नोव्हेंबर 2022 मंगळवार राञी 9. 58 वा. चोरीला गेली आहे. परळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जनसामान्यांच्या अडचणी आपल्या वृत्तपत्रात मांडून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांच्या मोटारसायकलचीच चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय?पोलिसांनी त्वरित या चोरीचा शोध लावला पाहिजे अशी मागणी होत आहे. घरफोड्या, वाहन चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ सुरु आहे.कोणत्याही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. 


● शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बनली शोभेची...!

        परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे. परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून केवळ 8 सीसीटीव्ही कॅमेरे वगळता सर्व सीसीटीव्ही कॅमेरे  पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळपास ५८ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.यापैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेची आॅपरेटिंग पोलीस प्रशासनाकडून केली जाते. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून ही यंत्रणा बंद झाली आहे.रस्ते सुरक्षा, वाहतूक , सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटना आदी सर्व सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त आहे.परंतु ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने शहराची सुरक्षाच धोक्यात आली आहे.गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त असतांना, ही यंत्रणा पोलीसांसाठी मदतीचा हात ठरत असतांनाही या तीसर्‍या डोळ्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

संबंधित बातम्या....

● पहा: माधवबागमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेतील चोर सीसीटीव्हीत कैद. | पोलीस तपास सुरु._#mbnews # subscribe #like #share #comments_


■ घरफोडीचे सत्र सुरूच :परळीतील माधवबाग मध्येही घरफोडी*


□ *पहा: चोरट्यांनी फोडले घर अन् पळविला ११लाखांचा ऐवज. | परळी पोलीसांना चोरट्यांचे आव्हान.* #mbnews # subscribe #like #share #comments


*मंदिरातील चोरीनंतर आता परळीत घरफोडी करुन अकरा लाखांची चोरी*


🟥 *पहा: अशी झाली परळीतील हनुमान मंदीरात चोरी | कशा फोडल्यात दानपेट्या?* *_#mbnews #subscribe #like #share #comments_*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या