MB NEWS-माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन p

माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन 



 नेवासा (जि. अहमदनगर) :  अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले.



तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार