परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी
राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.अशी मागणी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शुक्रवार दि. 02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात.
याबाबत आ.धनजय मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातमी- Click:🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*
दरम्यान या बाबतीत एमबी न्युज ने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन नागरिकांना येणाऱ्या अडचणीचा मुद्दा पुढे आणला होता.याची दखल घेत आ.धनंजय मुंडे यांनी याबाबत आता आवाज उठवला आहे.यामुळे इच्छुक उमेदवारांना येणाऱ्या अडचणी दुर होतील अशी अपेक्षा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा