इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी

 लोखंडीच्या रुग्णालयासाठी ७९ पदांना मंजूरी 







बीड,  : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेवटच्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत 'काय हवे ते मागा परंतु गरिबांना 

चांगली रुग्णसेवा द्या' असे सांगीतलेले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील रिक्त पदांबाबत त्यांच्याकडे अहवाल पाठविन्यात आला होता. याला सावंत यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवत ७९ पदे मंजूर केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुधारणेसाठी बुस्टर डोस मिळाला असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

 

    गुरुवारी (दि.१५) शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 

काल्पनिक कुशल ६८ आणि काल्पनिक अकुशल ११ अशा ७९ 

पदांना मान्यता दिल्याचे आदेश निघाले आहेत. याबत डॉ. सुरेश साबळे म्हणाले, बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयातनंतर सर्वात मोठे रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे आहे. स्त्री 

रुग्णालय व परिचर्या प्रशिक्षण केंद्र व मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र असे भव्य दोन रुग्णालयांची उभारणी झाली. मात्र, १३ वर्षे दोन्ही भव्य रुग्णालये कार्यान्वित नव्हते. कोविडच्या काळात या दोन्ही ठिकाणी जंबो कोविड रुग्णालय चालविण्यात आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडवरील उपचार झाले. हजारो 

कोविड रुग्णांना लोखंडीच्या स्त्री रुग्णालय व वृद्धत्व उपचार व 

मानसिक आजार केंद्रात चालविलेल्या जंबो कोविड सेंटच्या माध्यमातून मिळाल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

मागील वर्षभरापासून दोन्ही ठिकाणी सिझेरिअन, डिलेव्हरी, इतर शस्त्रक्रीया व नेत्रशस्त्रक्रीया मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. मात्र, या ठिकाणी ७९ पदे रिक्त होते. त्यामुळे गरिब रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर व नंतर मुंबईला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा लक्षात आणून देण्यात आला. दरम्यान मंत्री सावंत यांनी लोखंडीच्या वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातील रिक्त असलेले ७९ पदे भरण्यास मंजूरी देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. त्यानुसार गुरुवारी काल्पनिक कुशल ६८ व काल्पनिक अकुशल ११ अशा ७९ पदांना मंजूरी मिळाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. या पदांसाठी दरवर्षी एक कोटी ८१ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले. मंजूर पदांमध्ये अधिपरिचारिका, आहार तज्ज्ञ, क्ष - किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, नेत्रशल्यचिकीत्सक, नेत्रशल्यचिकीत्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष, युनानी, होमिओपॅथीक), योगा व नॅचरोपॅथीस्ट, लिपीक, शिपाई, रक्तपेीढी परिचर, कक्षसेवक आदी पदांचा समावेश असल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!