इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी

 ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी



बीड : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची मोठी अडचण निर्माण होत आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेकांना जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बार्टीच्या विभागप्रमुखांनी केवळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी म्हणून ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यास परवानगी दिली आहे.






राखीव जागांवरून निवडणूक लढविण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांनी पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोच पावती जोडली तरी अर्ज दाखल करता येतो. मात्र जात पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने सर्व्हरच्या अडचणींमुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या जात पडताळणीसाठीचे अर्ज केवळ शुक्रवार (दि. २) या दिवशी ऑफलाईन दाखल करण्यास बार्टीच्या विभागप्रमुखांनी परवानगी दिली आहे. विभागप्रमुख नंदकुमार बेडसे यांनी हे आदेश दिले आहेत. यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!