इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

 डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी




बीड: मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे


            विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.


        दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर मादळमोही या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या दोघांत नेहमीच किरकोळ कारणावरून टोकाचे भांडण झालेले गावकरी सांगतात. हे दोन्ही डॉक्टर एकमेकांना बोलताना देखील टोमण्यातच बोलत असल्याचं अनेकांनी सांगितले.



Click:● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments




      दोन्ही डॉक्टरांमध्ये झालेला वाद क्षुल्लक कारणावरून हाणामारीपर्यंत पोहोचणे. हे काय इतरांना नवीन नव्हतं. मात्र हा वाद सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने याचा फायदा घेत डॉक्टर हरकोटने बिर्ला विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये शिवीगाळ केली असेही त्यांनी म्हणलं. सीसीटीव्हीमध्ये देखील मारहाण करताना डॉ. बिर्ला दिसत आहेत. मात्र या डॉक्टरांचे नेहमीचेच वाद असल्याचे स्थानिक लोक म्हणतात. हा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या या फ्री- स्टाईल हाणामारीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.




Click:

■ *सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....