मोह्याची कन्या झाली मंडळाधिकारी
अभिनंदनचा वर्षाव
शिरसाळा प्रतिनिधी
परळी तालुक्यातील मोहा येथील माहेरवाशीन असलेल्या कन्येची अंबाजोगाई तहसील महसूल मंडळात मंडळाधिकारी पदी पदोन्नती झाली. मोहा सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
मोहा येथील निवृत्त सहशिक्षक शंभू लिंग स्वामी यांची मुलगी श्रीमती माधुरी कुमार स्वामी ही परळी तहसील येथे तलाठी पदावर रुजू झाली होती.9 वर्ष सेवा बजावल्यानंतर अंबाजोगाई येथील तहसील ला तलाठी पदावर कार्यरत असताना नुकतीच माधुरीची मंडळाधिकारी पदावर पदोन्नती झाली. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत महसूल मंडळात कार्यरत होत चांगली कामगिरी केली आहे. तलाठी पदावर असताना अंबाजोगाई तहसील अंतर्गत धावडी तलाठी सज्जातील शेतकऱ्यांची कामे कर्तव्य तत्परतेने पार पाडली आहेत. पदोन्नतीने उजनी महसूल मंडळात मंडळ अधिकारी पदावर काम करताना आपणास आनंद होत असल्याची प्रतिक्रिया माधुरी स्वामींनी दिली आहे. माधुरी स्वामी यांच्या पदोन्नती निमित्त अखिल भारतीय वीरशैव महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख विजय जंगम, वैजनाथ स्वामी, संतोष स्वामी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. मोहा ग्रामवासियांकडुन माधुरी स्वामी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिनंदन स्वामी मॅडम
उत्तर द्याहटवाCongratulations 👏
उत्तर द्याहटवाCongrtulation
उत्तर द्याहटवा