इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:मोह्याची कन्या झाली मंडळाधिकारी

 मोह्याची कन्या झाली मंडळाधिकारी



अभिनंदनचा वर्षाव

शिरसाळा प्रतिनिधी

परळी तालुक्यातील मोहा येथील माहेरवाशीन असलेल्या कन्येची अंबाजोगाई तहसील महसूल मंडळात मंडळाधिकारी पदी पदोन्नती झाली. मोहा सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.


मोहा येथील निवृत्त सहशिक्षक शंभू लिंग स्वामी यांची मुलगी श्रीमती माधुरी कुमार स्वामी ही परळी तहसील येथे तलाठी पदावर रुजू झाली होती.9 वर्ष सेवा बजावल्यानंतर अंबाजोगाई येथील तहसील ला तलाठी पदावर कार्यरत असताना नुकतीच माधुरीची मंडळाधिकारी पदावर पदोन्नती झाली. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत महसूल मंडळात कार्यरत होत चांगली कामगिरी केली आहे. तलाठी पदावर असताना अंबाजोगाई तहसील अंतर्गत  धावडी तलाठी सज्जातील शेतकऱ्यांची कामे कर्तव्य तत्परतेने पार पाडली आहेत. पदोन्नतीने उजनी महसूल मंडळात मंडळ अधिकारी पदावर काम करताना आपणास आनंद होत असल्याची प्रतिक्रिया माधुरी स्वामींनी दिली आहे. माधुरी स्वामी यांच्या पदोन्नती निमित्त अखिल भारतीय वीरशैव महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख विजय जंगम, वैजनाथ स्वामी, संतोष स्वामी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. मोहा ग्रामवासियांकडुन माधुरी स्वामी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या