MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये समाज कल्याण विभाग अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये समाज कल्याण विभाग अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप   

 परळी प्रतिनिधी----जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज मध्ये भारतरत्न ,भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या बार्टी व समाजकल्याण विभागामार्फत सामाजिक समता पर्व हा कार्यक्रम आयोजित केला होता. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचा उपक्रम महाविद्यालयात आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक सुविधा विषयी माहिती देणे. हा उद्देश घेऊन हा उपक्रम शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वैद्यनाथ कॉलेजमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.जे . व्हि जगतकर व समाज कल्याण विभागाचे अधिकारी श्री जोशी व्यंकटेश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष ,डॉ. जे. व्हि जगतकर, समाज कल्याण विभागाचे अधिकारी श्री व्यंकटेश  जोशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे, प्रेवेक्षिका प्रा. मंगला पेकमवार, सौ. लव्हारे मॅडम, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ किरवले सोमनाथ यांनी मानले.


Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार