परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नंदकिशोर तोतला यांची माहेश्वरी सभेच्या प्रदेश संयुक्त मंत्रीपदी बिनविरोध निवड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले नंदकिशोर तोतला यांची माहेश्वरी सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संयुक्त मंत्रीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेश्वरी सभेच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येतात. महाराष्ट्र स्तरावर माहेश्वरी सभेच्या संघटनेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. माहेश्वरी सभेच्या विविध पदांवर आतापर्यंत परळीतील नंदकिशोर तोतला यांनी काम केलेले आहे. ज्येष्ठ समाजसेवक व तळमळीने काम करणारा सामाजिक स्तरावरील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नंदकिशोर तोतला यांची माहेश्वरी सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संयुक्त मंत्रीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*
Video
Advertise
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा