MB NEWS:धन्यतेचा क्षण: छत्रपती आले घरा........!

 धन्यतेचा क्षण: छत्रपती आले घरा........!


 मनासारखा राजा अन् राजांचं साधेपण


स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे कोल्हापूर काल परळी येथे नियोजित कार्यक्रमानिमित्त आले होते छत्रपती संभाजी राजे मराठवाड्यात येण्यापूर्वी प्रत्येक वेळी मला फोन करायचे तीच परंपरा चालू ठेवत छत्रपती संभाजी राजांनी दोन दिवसापूर्वी मला फोन केला तू थांब कुठेही जाऊ नको आणि त्यांच्या स्विय सहाय्यक अजय पाटलांच्या संपर्कात रहा असा आवर्जून सांगितलं परळीत येण्यापूर्वी अजय पाटील हे माझे संपर्कात होते.


मी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी तेलगाव येथे जाऊन थांबलो त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत घेतलं तिथून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चेंबरी रेस्ट हाऊस व वैद्यनाथ मंदिर पर्यंत सोबत ठेवलं आणि आवर्जून मला सांगितलं गाडीमध्ये असताना मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे त्यांचा नियोजित कार्यक्रम संपला त्यानंतर ते माझ्या घरी आले मी व माझ्या सर्व मित्रमंडळीने त्यांचे आदरयुक्त स्वागत केले.

 त्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शाहू महाराजांचे रक्ताचे व विचाराचे वारसदार कुटुंबातील एक सदस्य आहेत त्याप्रमाणे घरात वावरत होते हे बघून माझ्या घरात कुटुंबातील सर्वजण तसेच सर्व शिवप्रेमी माझे मित्र मंडळी अचिंबित झाली इतके साधेपणाने राजे राहतात हे पाहून मी व माझ्या सर्व कुटुंब परिवार मित्रपरिवार छत्रपती संभाजी राजांचा मनापासून आभारी आहे त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीव लावला त्याबद्दल मी त्यांचा सदैव आभारी राहील.  खूप नेते व पुढारी पाहिले पण राजासारखं कोणीच पाहिला नाही खरंच मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारे एकमेव छत्रपती संभाजी राजे आहेत असं सर्व माझे मित्र मंडळी मला सांगत होती. राजकारणाच्या पलीकडचे नातं राज्यांनी माझ्यासोबत जपलं आहे मी राजेंचे उपकार कधीच भेटू शकत नाही.

 जय जिजाऊ- जय शिवराय- जय शंभुराजे

             ✍️  - संतोष शिंदे, परळी वैजनाथ 

---------------------------------------------


--------------------------------------------

Advt.......





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार