इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS: वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन

वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त मित्ती वैशाख वद्य १शनिवार, दिनांक ०६.०५.२०२३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    
        श्री गुरु सोपानकाका मंदिर ता. परळी वैजनाथ, जि. बीड  येथे दिनांक ०६.०५.२०२३ रोजी सकाळी ११ ते १२.३० वा पर्यंत श्री.ह.भ.प. बंडोपंत महाराज कोद्रीकर व श्री.ह.भ.प. वेदांताचार्य विनायक महाराज मानोलीकर यांचे प्रवचन होईल. दुपारी १ ते ३ श्री.ह.भ.प.कृष्णकांत महाराज सताळकर यांचे किर्तन व नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ ते ११ श्री. ह.भ.प.मौनीबाबा परभणीकर यांचे किर्तन होईल.

       तरी  या सोहळ्यात  फडावरील महाराज मंडळी, गुणीजन गायक, वादक, श्रोते मंडळी, पाहूणे मंडळी यांनी कार्यक्रमास व भोजनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. विठ्ठल उत्तम महाराज उखळीकर, श्री. विश्वंभर उत्तम महाराज उखळीकर, श्री. दिनानाथ उत्तम महाराज उखळीकर व समस्त उखळीकर परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या