MB NEWS:परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

 संघटीत लढ्यानेच कामगारांचे प्रश्न सुटतील-अॅड. अजय बुरांडे

परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

परळी:  कामगारांच्या संघटित लढयानेच कामगारांचे प्रश्न सोडवू असे स्पष्ट मत अँड अजय बुरांडे यांनी 1 मे च्या परळी येथील मेळाव्यात व्यक्त केले.

        बीड जिल्हा सीटू च्या वतीने परळी येथील विठ्ठल मंदिरात कामगारांचा मेळावा आयोजीत केला होता. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.बी.जी खाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. प्रभाकर नागरगोजे काॅ. पी. एस. घाडगे, श्री रामराजे महाडीक व कॉ किरण सावजी उपस्थित होते.अँड बुरांडे यांनी आपल्या भाषणात पूढे सांगितले की, कामगारांनी आपल्या संघटित लढ्यानेच जगभर भांडवलदारांची  गुलामी ठोकरली व आठ तासाचा कामाचा दिवस ठरून घेतला. आपल्या संघटित लढ्यानेच कामगारांच्या हिताचे कायदे  करायला सरकारला भाग पाडले. परंतू आता  'मोदी' सरकार भांडवलदारांच्या हिताचे  कायदे करत आहे. लाखो कामगार, शेतकरी व शेतमजुरांनी दिल्लीत मोर्चा काढून सरकारच्या धोरणास विरोध केला आहे." नाशीक येथून  10 हजारपेक्षा जास्त शेतकर्यांनी पायी मोर्चा काढून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. लोकशाहीमध्ये  संघटित लढ्याला महत्त्व आहे. कामगारानी धार्मिक व जातियवादावर  आधारित आंदोलना पासून स्वत:ला दूर ठेवले पाहीजे व त्यास विरोध केला पाहिजे. मेळाव्यात काॅ. रामराजे महाडीक, कॉ. पी.एस घाडगे, काँ प्रभाकर नागरगोजे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात कामगारानी जाती पातीच्या राजकारणात जागरूक राहून यास विरोध करावा व सामूहिक कामगार हिता साठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

       मेळव्याचे प्रास्ताविक बांधकाम कामगार संघटनेचे शेख जावेद यांनी तर कार्यक्रमाचे संचलन बांधकाम कामगार संघटनेचे प्रकाश वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, शालेय पोषन आहार कामगार, आशा, नगरपालिका कामगार व सेवानिवृत कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन आशा-संघनेच्या सुवर्णा रेवले यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिका यूनियनचे विकास केदारे, जगन्नाथ शहाणे, सीटूचे जालिंदर गिरी, बांधकाम कामगार संघनेचे शेख जावेद, प्रकाश वाघमारे आशा संघटनेच्या आशा लांडगे, अनिता चाचाटे यांनी मेहनत घेतली.


Advt.......






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !