MB NEWS:दुःखद वार्ता : भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील (काका) लोमटे यांचे निधन

 दुःखद  वार्ता : भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील (काका) लोमटे यांचे निधन




अंबाजोगाई  :-बीड जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील काका लोमटे यांचे आज शुक्रवार दि. ५ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेतच दुःखद निधन झाल्याची घटना घडली आाहे. या घटनेची माहिती अंबाजोगाई व तालुक्यातील लोकांना झाल्यानंतर अनेकांनी स्वा.रा.ती. रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यांच्यावर उद्या सकाळी ११ राजता बोरुळ तलाव स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहेत.


सुनील काका लोमटे म्हणजे एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व, सामान्य माणसाप्रती प्रचंड आदरभाव आणि सहकार्य करण्याची त्यांची भुमिका होती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करुन भाजपाची विचारधारा तळागाळामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर माजी मंत्री पंकजाताई मुंडे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यांनी भाजपचे काम प्रभावीपणे केले. अंबाजोगाई तालुक्यात भाजपाला भोळख मिळवून देण्याचे काम त्यांच्या हातून झाले. एक निडर, खंबीर, मायाळू आणि संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणून यांची ओळख होती जनसामान्यांच्या प्रश्नावर धावून जाणारा आाणि मदत करणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या अर्धांगीनी शोभाताई लोमटे या अध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार होत्या. भाजपला या ठिकाणी जनाधार नसतानाही सुनिल लोमटे यांनी वैयक्तिक पातळीवर मते खेचली. प्रतिष्ठेची लढाई त्यावेळी पाहायला मिळाली.  अतिशय निसटता पराजय त्यावेळी त्यांना स्वीकारावा लागला होता .सुनिल काका लोमटे म्हणजे कमी बोलणे आणि अधिक काम करणे असे व्यक्तीमत्व होते. राजकारणातसुद्धा संयम हा त्यांच्याकडून शिकण्यासारखा होता. भाजपची बुलंद तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे तेवढी धमक आणि तेवढे धारिष्ट्र त्यांच्याकडे होते. आज दुपारी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या खोलीत दुपारची झोप घेण्यासाठी गेले त्यावेळी खोली बंद करुन झोपले असता ते नेहमीच्या उठण्याची वेळ झालीतरी कसे उठले नाहीत हे पाहाण्यासाठी घरची मंडळी गेली असता त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने झोपेतच दुःखद निधन झाल्याचे समजले. त्यानंतर ही बातमी अनेकांना कळताच त्यांच्या निवासस्थानाकडे गर्दी होवू लागली. एका तरुण कार्यकर्त्यांचे असे अर्धेवर अकाली जाणे कोणाच्याही मनाला पटणारे नाही. बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाचा प्रभाव होता. लोकनेत्यांनी त्यांना राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान निर्माण करुन दिले होते. अशा तरुण कार्यकर्तेचे झोपेतच निधन होणे आणि तेही हृदयविकाराने ही चिंताजनक बाब आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी ११ वाजता बोरुळ तलाव स्मशानभुमी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुनील काका लोमटे यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.



--------------------------------------------

Advt.......







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !