MB NEWS:मनसेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

 मनसेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवतीर्थ कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी परळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सचिन कागदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सचीन कागदे यांनी बोलताना सांगीतले की 'सर्वांनी गौतम बुद्धांनी दिलेली अहिंसेच्या शिकवणीचा अवलंब करून विश्वकल्याण करण्याचा प्रयत्न करावा' असे प्रतिपादन केले.


"बौद्ध धर्माचे संस्थापक, महान दार्शनिक, धर्मगुरू आणि समाज सुधारक महात्मा गौतम बुद्ध यांनी आपल्या विचारांनी संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवला. आपल्या थोर विचारांनी आणि उपदेशांनी जगाला नवा मार्ग दाखविणाऱ्या भगवान गौतम बुद्धांनी समाजात अभूतपूर्व परिवर्तन आणण्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या उपदेशांचा उपयोग आपल्या जीवनात केल्यामुळे अनेक लोक आपल्या आयुष्यात केवळ यशस्वीच झाले असे नव्हे तर त्यांच्या हृदयात समाजाप्रती प्रेम, आदर, सदभावाच्या भावनेचा विकास देखील झाला." अशा भावना मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी व्यक्त केल्या.


"भगवान गौतम बुद्धांनी तत्कालीन रूढी-परंपरांचे, अंधविश्वासाचे, खंडन करून एका सहज सोप्या मानवधर्माची स्थापना केली. ते म्हणतात, आपल्या जीवनात संयम, सत्य आणि अहिंसेचे पालन करून पवित्र आणि साधे जीवन व्यतीत करावयास हवे.  त्यांनी कर्म, भाव, आणि ज्ञानासमवेत ‘सम्यक’ साधनेवर भर दिला कारण कुठलीही ‘अतिशयोक्ती’ शांतता देऊ शकत नाही." असे प्रतिपादन मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी केले.


याप्रसंगी परळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सचिन जी कागदे, मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी,मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण,माणिक लटींगे, अनंत सोळंके,  अदी मान्यवर उपस्थित होते.


--------------------------------------------

Advt.......







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !