MB NEWS:परळी वकील संघाचे कोर्ट डिक्रीबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन !

 परळी वकील संघाचे कोर्ट डिक्रीबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन  ! 




परळी वैजनाथ..

कोर्टातील तडजोडपत्र व कोर्ट डिक्रीबाबत शेतकरयांना महसूल प्रशासनाकडून होत असलेली अडवणुक थांबवावी व फेरफार विना नोंदणी व  मुद्रांक शुल्क न आकारता तात्काळ घेण्याबाबत जिल्ह्यातील तहसिलदार यांना निर्देश द्यावेत  असे निवेदन परळी वकील संघाने जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे यांना दिले. 

न्यायालयामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या तडजोड पत्रावर व  वाटणी पत्रावर व मालकी घोषणेच्या न्यायालयीन डिक्रीवर यापुढे कोणतेही मुद्रांक शुल्क आकारू नये व तात्काळ फेरफार घेण्यात यावे असे निवेदन आज कन्हेरवाडी येथे जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे देण्यात आले.त्या कन्हेरवाडी येथे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आल्या होत्या . याबाबत बार्शी वकील संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने कोर्ट डिक्री नोंदणीकृत करण्याची व मुद्रांक शुल्क देण्याची गरज नाही असे स्पष्ट केले आहे.तरीही बीड जिल्ह्यातील काही तलाठी व मंडळ अधिकारी कोर्ट डिक्री नोंदणीकृत करण्याची सक्ती करुन शेतकरयांची लुट करत आहेत याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. यापूर्वी ही औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय दिला असतानाही महसूल अधिकारी जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करुन शेतकरयांना मुद्रांक शुल्काबाबत सक्ती करत आहेत.

 न्यायालयाची डिक्री नोंदणी करण्यासाठी तोंडी सक्ती करत आहेत व कागदपत्रे स्विकारले जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील व  परळी तालुक्यात  शेतकऱ्यांची कुचंबना होत होती व लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत परळी वकील संघाने यापूर्वीही आवाज उठवून शासन स्तरावर कुटूंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या तडजोड पत्रासाठी मुद्रांक शुल्क आवश्यक नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे निवाडे दिले होते. तसेच न्यायालयीन आदेशानंतरही फेरफार घेण्यास कसूर करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. तसेच याबाबत माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड  यांना महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या अडवणूकीची कल्पना दिली .

यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष श्री वैजनाथ नागरगोजे जेष्ठ विधीज्ञ अँड पी एम सातभाई अँड आर व्ही गित्ते अँड व्हि एस फड अँड मिर्झा मंजूर अली अँड राहुल सोळंके अँड सोपानराव मुंडे अँड ज्ञानोबा मुंडे  विकास टेकाळे अँड प्रविण फड अँड बुद्ध रत्न उजगरे अँड केशव अघाव इत्यादी उपस्थित होते

--------------------------------------------

Advt.......





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार