MB NEWS:जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुक;वैद्यनाथ विकास पॅनलची पत्रकार परिषद

  12 वर्षे मतदारांना मतदानापासुन वंचित ठेवणार्यांना थारा देऊ नका 


जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुक;वैद्यनाथ विकास पॅनलची पत्रकार परिषद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या भल्यासाठी मी 1985 पासुन लढा देत आहे.2010 साली नविन सभासदांची यादी नियमाप्रमाणे दाखल करण्यात आली होती.परंतु संस्थेत गैरकारभार करण्यासाठी काही जणांनी या यादीला विरोध केला यामुळे 12 वर्षे सभासदांना मतदानापासुन वंचित रहावे लागले.आम्ही न्यायालयीन लढा लढत सभासदांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करुन दिली असुन याला विरोध करणार्यांना थारा देवु नये असे आवाहन सदाशिवअप्पा मुंडे यांनी केले.जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीतील वैद्यनाथ विकास पॅनलच्या उमेदवारांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार आरोप केले.

 औद्योगिक वसाहत सभागृहात गुरुवारी सायंकाळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ विकास पॅनलच्या उमेदवारांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी बोलताना सदाशिवअप्पा मुंडे म्हणाले की,आम्ही 1985 पासुन संस्थेच्या भल्यासाठी लढत आहोत.2010 साली संचालक मंडळाच्या सर्वसंमतीने 468 नविन सभासदांची यादी नियमाप्रमाणे मंजुरीसाठी पाठविली.या यादीला जुगलकिशोर लोहिया,दत्ताप्पा ईटके व त्यांच्या सहकार्यांनी विरोध केल्याने दर तीन वर्षाला निवडणुक होणे अपेक्षित असताना ती 12 वर्षे झाली नाही.संस्थेला खाजगी क्लासेस घेण्याचे नियम नसताना त्यांनी जवाहर एज्युकेशन सोसायटी मार्फत खाजगी क्लासेस सुरु करुन 4 कोटी 20 लाख रुपये फिस वसुल केली. त्यांनी खाजगी कर्जासाठी या संस्थेच्या पैशाचा वापर केला.खाजगी क्लासेस प्रकरणात तक्रार करताच त्यांना तीन महिने फरार रहावे लागले. संस्थेच्या हितासाठी कायम आड येणार्या पॅनलला थारा देवु नका असे आवाहन मुंडे यांनी केले.या पत्रकार परिषदेस पत्रकार परिषदेस मुंडे सदाशिवअप्पा सिताराम, मुंडे त्रिबक पाटलोबा उर्फ प्रा.टी.पी.मुंडे सर, कराड फुलचंद एडबा, चाटे भास्कर पाटलोबा, अर्धापुरे प्रा.अरुण माधव,  चौधरी जगदीश गंगाधरप्पा, देशमुख उत्तम काशिनाथराव, देशमुख विजयकुमार वामनरावजी, देशमुख तानाजी देविदासराव, अॅड. देशमुख नागनाथ गोंविदराव, गिते डॉ. तुकाराम रानबा, कराड आत्माराम,  महादेव फड ज्ञानोबा वैजनाथ, मुंडे भिमराव लिंबाजी, खाडे प्रदिप शिवाजीराव, मुंडे गोविंद सदाशिवराव, मुंडे मधुकर तुकाराम, जाजू नंदकिशोर रामकृष्ण, बियाणी चंदुलाल मोहनलाल, वाकेकर अभयकुमार झुंबरलाल, लाहोटी जयपाल नंदलालजी, भन्साळी भिकुलाल व्दारकदास, सारडा ओमप्रकाश सीताराम, हालगे सोमनाथ नागनाथप्पा, चौधरी डॉ.सुरेश विरसंगप्पा, समशेट्टे चंद्रकांत गंगाराम आप्पा  यांची उपस्थिती होती.

--------------------------------------------

Advt.......





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार