इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठकीचे आयोजन

 संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठकीचे आयोजन 


 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-देवराव लुगडे 


परळी वैजनाथ..

.

आज शनिवार सहा मे रोजी संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठकीचे आयोजन सुज्वल मंगल कार्यालय जलालपूर रोड परळी येथे सकाळी 10.00 वाजता होणार आहे. तरी या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री डॉ गजानन पारधी सर, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अण्णासाहेब सावंत मामा, प्रदेश संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे, विभागीय अध्यक्ष ऍड राहुल भैया वाईकर हे राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे , जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शिवमती अश्विनीताई यादव, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव नारायण मुळे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मिसाळ ,जिल्हा उपाध्यक्ष गोपाळराव काटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल खोडसे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संभाजीराव घोरपडे, केज तालुका अध्यक्ष कैलासराव चाळक, अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष दत्ता गंगणे, केज तालुका कार्याध्यक्ष सचिन साखरे, अंबाजोगाई शहराध्यक्ष सिद्राम यादव हे असणार आहेत.तरी या बैठकीला  संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी शहर कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.

--------------------------------------------

Advt.......






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या