MB NEWS:सहायक सभासदांचे १०० टक्के पण तहयात सभासदांचे ६६ टक्के मतदान

 जवाहर  एज्युकेशन सोसायटीचे मतदान झाले मात्र निकाल राहणार गुलदस्त्यात !

सहायक सभासदांचे १०० टक्के पण तहयात सभासदांचे ६६ टक्के मतदान

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीचे प्रत्यक्ष मतदान आज शनिवारी (6 मे ) रोजी झाले.परळीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीचे मतदान झाले असले तरी या निवडणुकीचा निकाल सध्या गुलदस्त्यातच राहणार आहे.
      परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.यासाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडले आहे.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये प्रमुख लढत झाली.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या निवडणुकीत दोघेही बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित जागांसाठी आज 6 मे रोजी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत सहायक सभासदांचे १०० टक्के मतदान झाले पण तहयात सभासदांचे ६६ टक्के इतकेच मतदान झाले आहे. सहायक सभासद गटातून एकूण १० पैकी १० मतदान झाले.तर तहयात सभासद गटातून एकूण १२११ मतांपैकी ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.



  
     दरम्यान, जवाहर एज्युकेशन सोसायटीवर ताबा कोण घेणार? हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाही. कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !