इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती

 टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी तालुक्यातील विकासात्मक कामात अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या  टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने  रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने  रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा.  जि.प.प्रा. शाळा, टोकवाडी येथे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.आदर्श गाव, पाटोदा निर्मितीचे जनक भास्करराव पेरे पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ व माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्यपद्मश्री डॉ. तात्याराव लहाने  हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.परळी-वै गटविकास अधिकारी संजय केंद्रे,ग्रा.पं. रुई ता. गेवराई (रेशीम उद्योग गाव) सरपंच कालिदास नवले,पं. स. परळी वै.सभापती बालाजी (पिंटू) मुंडे , ग्रा.पं. आवरगाव ता.धारुर (स्मार्ट व्हिलेज) सरपंच अमोल जगताप,ग्रा.पं. मस्साजोग ता. केज (स्मार्ट व्हिलेज)सरपंच संतोष  देशमुख , आदर्श ग्रामसेवक, बीड सखाराम काशीद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

        ग्रामपंचायत टोकवाडी यांच्यावतीने विवीध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार असुन यामध्ये जि.प.प्रा. शाळा सांस्कृतिक सभागृह, अंगणवाडी क्र. २, शादीखाना, देवी मंदिर सभागृह क्र. १ व २, गावअंतर्गत इंटरनेट सुविधा आदी विकासकामांचा समावेश आहे. विविध विकास कामांचा लोकार्पणसोहळा व मार्गदर्शन समारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन टोकवाडी सरपंच सौ.गोदावरीताई डॉ. राजाराम मुंडे, टोकवाडी उपसरपंच अनिल मुंजाजी काळे, ग्रामसेविका सौ. सुनिता गणपतराव रांजणकर, ग्रा. पं. सदस्य डॉ. राजाराम लक्ष्मण मुंडे, सौ. प्रमिला तुकाराम पारधे, सौ. कल्पना बालाजी मुंडे,सौ. प्रियंका संतोष पारधे, श्री नागनाथ पंढरीनाथ काळे, सौ. सुनिता बाजीराव रोडे,सौ. मनिषा तुकाराम मुंडे,  प्रदिप धोंडीराम रोडे, सौ.स्वाती अंगद काळे,सौ. आशा माणिक मुंडे, सौ. अलका नामदेव मुंडे,आजम हामजा शेख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या