युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परळीकरांसाठी अभिमानास्पद

 परळीची सुकन्या अपेक्षा भालेरावची साहित्य क्षेत्रात भरारी;एमिली डिकिंसन पुरस्कारासाठी कवितासंग्रहाला नामांकन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     नामांकित प्रकाशन संस्था 'बुकलिफ पब्लिशिंग' ने परळीची सुकन्या अपेक्षा प्रमोद भालेराव हिचा 'होप' हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.विशेष म्हणजे या कवितासंग्रहाला जागतिक स्तरावरील कवयत्री एमिली डिकिंसन पुरस्कारासाठी  नामांकन प्राप्त झाले आहे. याबद्दल अपेक्षा भालेरावचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
     परळीतील सर्व परिचित एलआयसीचे विकास अधिकारी प्रमोद भालेराव यांची सुकन्या कु.अपेक्षा हिचा 'होप' नावाचा पहिलाच कवितासंग्रह नामांकित प्रकाशन संस्था 'बुकलिफ पब्लिशिंग' ने  प्रकाशित केला आहे. सर्व प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा कवितासंग्रह उपलब्ध झाला आहे. ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट यावर 'होप'  कवितासंग्रह लोकप्रिय ठरत आहे.विशेष म्हणजे या कवितासंग्रहाला जागतिक स्तरावरील कवयत्री एमिली डिकिंसन पुरस्कारासाठी  नामांकन प्राप्त झाले आहे.
      'होप' या कवितासंग्रहात
हार्ट टू हार्ट संवाद कवितेच्या रूपात मांडला असुन या कविता ह्रदयाला भिडणाऱ्या आहेत. जीवनाचे पैलू, सर्व भावना, जाणिवा व  भावनांच्या हिंदोळ्यांचे संकलनच यामाध्यमातून  झालेले आहे. कु.अपेक्षा हिचा 'होप' हा पहिलाच कवितासंग्रह आहे. सृजनशील कवयत्री म्हणुन उदयास येत असलेली अपेक्षा हिने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली असून तिला लेखनाची आवड आहे. हे तिचे पहिले पुस्तक आहे आणि अजून बरेच काही लिहिण्याची इच्छा आहे. सध्या ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.परंतु तिच्या माध्यमातून परळीतील एक प्रतिभावंत साहित्यिक, कवयत्री समोर आली आहे.तिची साहित्य क्षेत्रातील ही गौरवास्पद वाटचाल परळीसाठी अभिमानास्पद बाब आहे.तिच्या या भरारीसाठी सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

कु अपेक्षा भालेराव हिचा 'होप' कवितासंग्रह  ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.आपण प्रत मागऊन तिला आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा.(HOPE)

👇👇👇👇👇👇





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या