मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव

 मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव



अंबाजोगाई, प्रतिनिधी.....
            गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती अधिकृतपणाने ठराव घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून मराठा लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.


        मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे.


         मौजे राजेवाडी ता. अंबाजोगाई येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा अधिकृत ठराव घेतला.मराठा आरक्षणाला पाठिंबा  म्हणून पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.गावच्या सरपंच रोहिणी विलास काचगुंडे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार