ऐतिहासिक व सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यासाठी शालेय अभ्यास सहलींचे आयोजन

 अंबाजोगाई ऐतिहासिक व सांस्कृतिक समृद्ध वारसा : परळीच्या लावण्याई  पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्थळांना दिल्या भेटी



........

ऐतिहासिक व सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यासाठी शालेय अभ्यास सहलींचे आयोजन


...........................

परळी वैजनाथ दिनांक 27 डिसेंबर

परळी शहरातील लावण्याई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांना अभ्यासण्यासाठी अंबाजोगाईतील विविध स्थळांना भेटी देऊन आनंद लुटला.अंबाजोगाई येथील कोकणस्थांची कुलस्वामिनी असणाऱ्या श्री योगेश्वरी मातेच्या दर्शनाने या सहलीचा प्रारंभ झाला. अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिरातील प्राचीन व वास्तुकलेची, हेमाडपंथी मंदिरांची रचना, स्त्री वेशभूषा परिधान केलेला गणेश, मंदिरावरील कळसांमध्ये असणाऱ्या विविध ऐतिहासिक कथा यांचा अभ्यास केला. मराठी भाषेचे आद्यकवी विवेकसिंधूकार मुकूंदराज स्वामी यांची बालाघाट डोंगरातील कपारी मध्ये असणारी समाधीवर चिमुकल्यांनी नतमस्तक होऊन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. शंभरच्या वर पायऱ्या उतरल्यानंतर झालेले डोंगरकपारीतील समाधीचे दर्शन यामुळे चिमुकल्यांचा थकवा पार पळून गेला होता. वाटेमध्ये प्राचीन लेण्यांचा परिसर असणाऱ्या हत्तीखाना येथील वेगवेगळ्या लेण्यांना भेटी देऊन या लेण्यांचा ऐतिहासिक काळ व ऐतिहासिक दस्ताऐवज, या हत्तीखान्यामध्ये असणारी व परळीला जोडणारा भुयार मार्ग यांची माहिती घेतली. तसेच वनराईने नटलेल्या परिसरातील श्री रेणुका मातेच्या दर्शनाने विद्यार्थी प्रफुल्लित झाले. त्यांनी विविध खेळ खेळले. गाणी म्हटली. अंगत पंगत करून वनभोजनाचा आस्वाद घेतला.


वाचा :● *महत्त्वाची माहिती: 'एम.फिल' पदवी बंद, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये :'यूजीसी'चा इशारा*


आज सकाळी परळी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते महादेव  ईटके  यांच्या हस्ते श्रीफळ  फोडून  सहलीला  निघालेल्या व थंडीची तमा न बाळगणाऱ्या चिमुकल्यांना अभ्यास सहलीसाठी  शुभेच्छा दिल्या.  

वाचा:● *भगवान दत्तात्रेय हेच फक्त अखिल विश्वाचे एकमेव विश्वगुरू- ॲड.दत्ता महाराज आंधळे*

या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष  अनंत कुलकर्णी  मुख्याध्यापक  कविता विर्धे , संघमिञा  पोटभरे  सुषमा देशमुख,  आकांक्षा  मॅडम, पालक अमर मोगरकर आदि उपस्थित होते.  लावण्याई  पब्लिक स्कुल मधील पालकांनी या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या सहलीमध्ये शिस्त व सूचनांचे पालन करून या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. शालेय विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास व आपल्या परिसरातील ऐतिहासिक समृद्ध स्थानांचा परिचय व्हावा यासाठी लावण्याई ने काढलेल्या या सहलीचे सर्वत्र कौतुक होत आहे




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !