आमरण उपोषणाची तारीख ठरली

 मनोज जरांगेची बीडमधून मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार



बीड : आंदोलक यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचंही जरांगे म्हणाले.


Click:● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा*


मनोज जरांगे काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली. मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारनं झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्यानं कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असं जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार