मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी

 कर्तृत्ववान नरेंद्र मनोहरदेव जोशींचा शिक्षणप्रेमी परळीकरांनी केला भव्य हृद्य सत्कार

मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील गणेशपार भागातील नरेंद्र मनोहरदेव जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. 


नरेंद्रचे आणि संपूर्ण जोशी कुटुंबियांचे कौतुक करण्यासाठी शनिवार दि. 23/12/2023 रोजी येथील राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक येथे परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नरेंद्रचा परळीकरांनी भव्य हृद्य सत्कार केला. 


कर्तृत्ववान भूमिपुत्रांसाठी नेहमी एकत्र येणारे सुजाण परळीकर आजही लिंग, जात, धर्म, पक्ष भेद विसरून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या नरेंद्र जोशींसाठी एकत्र आल्याचे चित्र सर्वांनी अनुभवले.

Click:● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा*


टॉवर ते सावता माळी मंदिर गल्लीतील नरेंद्रच्या घरापर्यंत रस्त्यांवर जागोजागी व्यापारी, महाविद्यालये, शिक्षण संस्था तसेच सामान्य नागरिकांनी नरेंद्रचा सत्कार केला तथा सुवासिनींनी औक्षण करून नरेंद्रला आशीर्वाद तथा शुभेच्छा दिल्या. दरम्यान जोशी निवास समोर अनौपचारिक कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापले छोटेखानी मनोगत व्यक्त केले. यानंतर सत्कारामुळे भारावून गेलेल्या नरेंद्र जोशींनी भावपूर्ण उत्तर दिले.


यावेळी शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, व्यापार, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकील, पत्रकारिता आदी क्षेत्रातील तथा सुजाण नागरिक उपस्थित होते.


मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी

पौरोहित्य करणाऱ्या माझ्या बाबांनी माझ्या लहानपणापासून शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न केले. आईनेही कधीच मला आता नौकरी कर शिक्षण बस असे कधी म्हंटले नाही.

तसेच शेजारच्या मंडळींनीही इतका मोठा झाला अजून किती दिवस परीक्षा देत राहणार असे टोमणे कधीच मारले नाहीत. माझ्या परिवारातील सदस्य तसेच आप्तेष्टांनी कधीच माझी पायखेची केली नाही हे मी माझे भाग्य समजतो.


मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे असे नरेंद्रने आपल्या मनोगतात सांगितले. परळीकरांनी केलेल्या हृद्य सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे. सर्वां प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे म्हणत आपला परळी परिसर स्पर्धा परीक्षांबाबत थोडा मागे आहे, त्यामुळे भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन असे अभिवचन नरेंद्रने दिले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार