21 व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी

 21  व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी



परळी/प्रतिनिधी

दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून या अनुषंगाने संपूर्ण बीड जिल्हयामध्ये मद्य व मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या अद्वितीय कार्यक्रमासाठी मागील अनेक दिवसापासून संपूर्ण देशामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे .  माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या कालावधीत देशभरामध्ये विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आव्हान केलेले आहे. दिनांक 22 जानेवारीला तर दुसरी दिवाळी साजरी करण्याचे सुचित केलेले आहे व त्याच अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी रोजी प्रभु श्रीरामांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचे सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे . सध्या देशात , राज्यात सर्वत्र भक्तीमय व मंगलमय असे वातावरण निर्माण झालेले आहे . वरील दोन ही दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचे असून दि. 22 जानेवारी हा सूवर्ण ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.

सर्वांनाच प्रत्यक्ष अयोध्येत जाणे शक्य नाही सर्व लोक आपआपल्या घरी , गावात हा आनंदक्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतील . पुजा अर्चा , झगमगाट व उपवास करून प्रभु श्रीरामाचे चरणी आपली भक्ती अर्पण करतील व अशा मंगलमय वेळी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री सुरू रहाणे योग्य वाटणार नाही तसेच या दोन्ही गोष्टी सदर दोन दिवस बंद ठेवणे ही प्रभू श्रीरामा प्रती एक प्रकारची श्रद्धाच ठरेल. करिता वरील दोन्ही दिवशी राज्य शासना मार्फत राज्यात निदान जिल्ह्यात तरी मद्य विक्रीस व मांस विक्रीस निर्बंध घालण्यात यावेत असे आवाहन शिवकुमार केदारी यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार