इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षणाचा आणि सत्तेचा अधिकार दिला-सरपंच सौ कल्पना खर्डे




मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी


पालम (प्रतिनिधी)

अत्यंत अडचणींना, संकटांना तोंड देत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवळ पुढाकारच घेतला नाही तर स्त्रीयांना सुशिक्षित करण्यासोबत त्यांना सत्तेचाही अधिकार मिळवून दिला असे मत मौजे तांबुळगावच्या सरपंच सौ.कल्पना बाबुराव खर्डे यांनी व्यक्त केले.

मौजे तांबुळगाव पालम  ग्रामपंचायत कार्यालय येथे आज बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच सौ. कल्पना खर्डे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक दिगंबर खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, लक्ष्मण जोरवर, माजी सरपंच माणिकराव उंदरे पाटील, माऊली जोरवर, बाबुराव खर्डे, काशिनाथ आवळे, पांडुरंग निळे, व्यंकटी निळे, शिवाजी नरसिंगराव गडेकर, रामेश्वर खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण ही काळाची तेव्हाही गरज होती आणि आजही आहे. परंतू प्रतिकुल परिस्थितीला लढा देवून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. स्त्री शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्काची जाणिव झाली असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर असताना दिसून येतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फु ले यांनाच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तांबुळगाव गावातील महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!