उष्माघातापासुन नागरिकांनी काळजी घ्यावी

 परळीत उष्माघाताचा बळी! भाजीपाल विक्रेत्यावर काळाचा घाला; कुटुंब उघड्यावर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असुन उन्हाच्या तीव्रतेने जीवाची लाही लाही होत आहे. वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही. यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असुन उष्माघाताने त्याचा बळी गेला आहे.
          परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव संभाजी गुट्टे वय 54 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात हातावर भाजीपाला विकतात. आजच्या आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी हे शेतकरी बसले होते. सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. परळीत दुपारच्यावेळी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका वाढलेला होता. उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असल्याने भरदुपारी उष्माघाताचा फटका या भाजीविक्रेत्याला बसला आणि भर बाजारातच उष्माघाताने भोवळ येऊन तो पडला. आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा तडकाफडकी मृत्यू झाला. परळी तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे.


      दरम्यान, महादेव संभाजी गुट्टे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असुन पत्नी, दोन मुले, दोन मुली  अशा परिवाराची उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारीच महादेव गुट्टे यांच्यावर होती. मात्र घरातील कर्ताधर्ता माणूसच गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार