प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !

परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


 परळी (प्रतिनिधी)

        परळी शहरातील बँक कॉलनी भागात शनिवार दि.29 जुन रोजी रात्री घडलेल्या गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असुन मरळवाडीचे सरपंच बापुराव आंधळे यांच्या मृत्युनंतर या घटनेत पहिल्या दाखल गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असलेल्या व जखमी झालेल्या महादेव गित्ते यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शनिवार दि.29 जुन रोजी परळी शहरातील बँक कॉलनी येथे रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर याप्रकरणी गोट्या उर्फ ग्यानबा गित्ते याच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेत जखमी असलेल्या महादेव उध्दव गित्ते रा.नंदागौळ,ह.मु.बँक कॉलनी परळी यांच्या फिर्यादीवरून आता या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, जखमी असलेल्या महादेव उध्दव गित्तेंवर अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात उपचार सुरु होते. महादेव गित्ते यांच्या फिर्यादीवरुन बुधवार दि.03 जुलै रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात  बापु आंधळे (मयत), राजेश ऊर्फ धनराज श्रीरंग फड, रघुनाथ फड, ग्यानोबा ऊर्फ गोटया मारोती गित्ते,सनि देवडे,सोमनाथ सलगरे,वाल्मीक अन्ना व इतर अनोळखी 15 ते 20 इसमाविरुध्द गुरन 108/2024 कलम 307,326, 323,143, 147,148,149, 504, 506, 427 भादवी 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असुन वरील आरोपींनी फिर्यादीच्या बँक कॉलनी परळी येथील घरासमोर दि.29 जुन रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास  गैरकायद्याची मंडळी जमवुन शिवीगाळ केली व घरावर विटा फेकुन मारल्या. फिर्यादीची भाड्याने आणलेली स्कॉर्पीओ गाडीची तोडफोड करुन नुकसान केले. फिर्यादी घराच्या बाहेर येताच आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे पोटावर पीस्टलने फायर करुन गंभीर जखमी केले व फिर्यादीचे हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या