वैद्यनाथ साखर कारखान्याचे भंगार चोरी करताना चौघांना पकडले
वैद्यनाथ साखर कारखान्याचे भंगार चोरी करताना चौघांना पकडले
परळी (प्रतिनिधी)
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअरमधील सामान चोरुन घेवुन जात असताना सुरक्षा रक्षकांनी सापळा रचत चौघांना घेरले यापैकी दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले तर दोघांना पकडुन कारखान्याचे संचालक माऊली मुंडे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी या चोरांना ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि.पांगरी हा दोन वर्षांपासुन बंद असुन कारखान्याच्या मशिन व सामानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.बालाजी दत्तराव मुंडे मंगळवार दि.2 जुन रोजी सकाळी 9 वाजता कामावर गेले असता त्यांना पाळी जमादार भास्कर सिद्राम मुंडे यांनी फोन करत स्टोअरमधील सामान पडले असल्याचे सांगितले.हा प्रकार चोरीसाठी असल्याचे लक्षात येताच सुरक्षा गार्ड राम नागोराव पाचुंदे,रामचंद्र भिमाबुवा भारती,शिवाजी शंकर मुंडे यांना सोबत घेवुन सापळा रचत चोरावर नजर ठेवली असता एम.एच.44 एए 0768 या क्रमांकाच्या स्कुटीवर दोघे व झाडीतुन दोघे असे चार जण पिन बार,मोटरी व ईतर पार्ट चोरुन नेत असताना पाठलाग केला असता दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले.
Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !
स्कुटीवरील दोघांना पाठलाग करुन पकडले व कारखान्याचे संचालक माऊली मुंडे यांना कळवळुन त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले याप्रकरणी साधु सुर्यकांत शिंदे वय-25 वर्षे,मुस्तफा अंबीर मुनीयार वय-26 वर्षे,ईश्वर परमेश्वर हंगे तिघेही रा.कौठळी व गोकुळ अशा चौघांविरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा