पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले

दोन दिवसाखालीच खून झालाय... चौकशी करायचीय थांबा म्हणत परळीजवळ वाटमारी !


पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी जवळच्या चांदापूर या गावाकडे जाणाऱ्या डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी येथील एका पती-पत्नीला आम्ही पोलिस आहोत असे म्हणून रस्त्यात थांबवले आणि आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्यांना तीन लाख रुपयाला लूटल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या तोतया पोलिसांनी या पती- पत्नीला भिती घालत दोन दिवसा खालीच इकडे खून झाला आहे. तुमची चौकशी करायची आहे असा संदर्भ देत या पती पत्नीला चांगलाच दम दिल्याचेही पुढे आले आहे. 

         या खळबळजनक व नागरिकांमध्ये पोलिसांच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, सुरेश केरबा मुंडे वय 70 वर्षे रा.डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी हे लुना गाडीवर परळी जवळील चांदापूर येथील त्यांचे व्याही माधवराव आर्जुन गित्ते रा. चांदापुर यांना हात ऊसणे देण्यासाठी म्हणून एका बॅगमधून  तीन लाख रुपये घेऊन निघाले. त्यांच्यासोबत लूनावर त्यांची पत्नीही सोबत होती.चांदापूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयासमोर दोन अनोळखी इसमांनी पोलीस स्टाईलने इशारा करुन त्यांना थांबवले. आम्ही पोलीस असुन मागिल दोन दिवसाखाली माणुस मारला आहे.चौकशी सुरु आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहेत वगैरे चौकशा केल्या.तसेच त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेत बॅगमधील रोख 300000 लाख रुपये फिर्यादीचे मनगटाला धरुन काढून घेवुन निघून गेले.

Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !

         याप्रकरणी सुरेश केरबा मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुरनं 188/2024 कलम 318(4),3(5), भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि झांबरे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार