परळीत कुत्रे पिसाळले !

 परळीत कुत्रे पिसाळले: 23 जणांना घेतला चावा ; नागरीकांनी काळजी घ्यावी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या दोन तासांमध्ये सुमारे 23 जणांचा सहावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. आज गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान चावा घेतलेल्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती.

       गुरुवार दिनांक 24 ऑक्चटोबर रोजी सांयकाळी 6.30 वाजल्याचे नंतर नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. समोर येईल त्याला आणि पुढे चालणाऱ्याला पाठीमागून चावा घेत अवघ्या दीड दोन तासांत 23 लोकांना जखमी केले चावा घेतलेल्या नागरिकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली.  तेथे रुग्णांना इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आले. दरम्यान अवघ्या काही वेळामध्येच रुग्णालयामध्ये अक्षरशः कुत्रा चावलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती.

     पिसाळलेला कुत्रा परिसरामध्ये धुमाकूळ घालत असून 23 चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिकेने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.

टिप्पण्या

  1. 23 नाही 30 जणांना म्हणजे काल 29 चा आकडा होता आज सकाळी 5 ला एकजण फिरायला आलेला व्यक्तीस चावला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार